सायबर भामट्यांनी लढवली ‘शक्कल’, व्यापार्‍याच्या खात्यातून 50 लाख ‘गायब’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मध्यवस्तीमधील एका व्यापार्‍याचा मोबाईल क्रमांक बंदकरून तोच क्रमांक पुन्हा कंपनीकडून सुरूकरून घेतल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावरून सायबर चोरट्यांनी तब्बल 50 लाख रुपये ट्रान्सफरकरून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघढकीस आली आहे. चोरट्याने केवळ तीन दिवसात हा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे सायबर चोरट्यांच्या नवनवीन क्लुप्त्यांनी पोलीसही हैराण झाले आहेत.

याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 26 ते 28 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घडला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहण्यास लोणी काळभोर परिसरात आहेत. त्यांचा फायनान्सचा व्यावसाय आहे. त्यांचे खडक परिसरात ऑफिस आहे. दरम्यान, त्यांचे व्यावसायिक बँक खाते आहे. फिर्यादी हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. त्यादरम्यानच त्यांचा मोबाईल क्रमांक अचानक बंद पडला. हा क्रमांक बँक खात्याशी कनेक्ट होता. ते मुंबईत असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

त्याच कालावधीत अज्ञाताने बनावट कागदपत्रद्वारे त्यांचा क्रमांक पुन्हा सुरू केला. त्या खात्यावरून बँक खात्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 50 लाख रुपये ट्रान्सफर केले. दुसर्‍या दिवशी फिर्यादी हे त्यांचा मोबाईल क्रमांक बंद झाला असून, तोच क्रमांक सुरू करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना हा क्रमांक सुरू असल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यावरून 50 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी खडक पोलीसांकडे तक्रार दिली. या तक्रारीची प्राथमीक चौकशी करण्यात आली. त्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे हे करत आ हेत.

Visit : Policenama.com