पुणे : रस्ता पेठेतील नामांकित ‘ट्रस्टी’ हॉस्पीटलचा ‘विश्वासघात’

पुणे पोलीसानामा ऑनलाईन – कराराची मुदत संपल्यानंतर बनावट करारानामा तयारकरून त्याद्वारे अतिक्रमणकरून रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालय चॅरिटेबल हॉस्पीटल ट्रस्टचा विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी राठी (वय 67, रा. कोथरूड) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रेसीडेंट, हेल्थकेअर मेडीकल फाऊंडेशन ट्रस्ट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प तसेच तत्कालीन मॅनेजिंग ट्रस्ट या दोघांवर भादवि कलम 405, 406, 448, 465 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रास्ता पेठेत शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालय चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पीटल आहे. ट्रस्टवर पुणे विद्यापीठाकडून 1993 मध्ये आरोपी क्रमांक दोनची मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नेमणूक केली होती. त्यावेळी ते काम पाहत असताना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही ताराचंद रुग्णालयात राबविण्यासाठी आयु.सी.यु युनिट असणे आवश्यक असते, अशी खोटी माहिती फिर्यादींना यांना दिली.

तसेच, त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लष्कर परिसरातील प्रेसीडेंट, हेल्थकेअर मेडीकल फाऊंडेशन ट्रस्ट यांच्याशी संगणमतकरून आयु.सी.यु चालविण्यासाठी 2016 मध्ये 33 महिन्यांचा लिखीत करारनामा केला. मात्र, हा करारनामा संपल्यानंतर फिर्यादींना करार वाढविण्यासाठी आरोपींनी विनंती केली होती. मात्र, त्यांच्याविरोधात तक्रारी असल्याने त्यांना करार वाढविण्यासाठी नकार देण्यात आला होता. त्याबाबत लेखी कळवून आयु.सी. यु.चे युनिट बंद करण्यात आले होते.

परंतु, तरीही रुग्णालयात हे युनिट अनधिकृत रित्या सुरू ठेवून आर्थिक फायदा घेतला. तसेच, रुग्णालयात अतिक्रमन केले. यासोबतच दोघा आरोपींनी युनिटमधील 7 महिला कर्मचार्‍यांना ट्रस्टीच्या बैठकीत ठराव न पास करता नियमबाह्य रितीने त्यांना रुग्णालयाच्या नसींंग हॉस्टेलमध्ये निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्याबाबतचे अनधिकृत पत्र हॉस्टेलच्या वॉर्डनला देण्यात आले होते.

33 महिन्यांचा करार संपल्यानंतर पुन्हा 27 महिन्यांचा करार केल्याचे खोटे दस्तऐवज करून ते फिर्यादीला दाखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/