Cheating Fraud Case Pune | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख असून मुलाला पाणी पुरवठा विभागात नोकरी (Lure Of Job In PMC) लावतो असे आमिष दाखवून 8 लाख 64 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार मे 2021 ते मार्च 2023 या कालावधीत शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट (Patil Estate Shivaji Nagar) येथे घडला आहे.

याबाबत दिलीप गणपत खिलारे (वय-63 रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मच्छिंद्र भिमराव धोत्रे Machindra Bhimrao Dhotre (वय-45 रा. वडारवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मच्छिंद्र धोत्रे याने फिर्यादी यांना पुणे महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून कामे घेत असल्याचे सांगितले.(Cheating Fraud Case Pune)

मच्छिंद्र धोत्रे याने फिर्यादी यांना पुणे महापालिकेतील अनेक मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांच्या मोठ्या मुलाला महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात फिटर म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवले.
नोकरी लावण्यासाठी धोत्रे याने 8 लाख 64 हजार 600 रुपये रोख व चेक स्वरुपात घेतले.
पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाला नोकरी लावली नाही. फिर्यादी यांनी धोत्रे याच्याकडे पैशांची मागणी केली असता
त्याने पैसे देण्यास टाळाटाळ करुन आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rape Case Pune | पुणे : मैत्रीचे रुपांतर प्रेमात, लग्नाच्या आणाभाका घेत मुलीवर अत्याचार

Dhayari Pune Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन जीवे मारण्याची धमकी