Cheating Fraud Case Pune | पुणे : दुचाकी व चारचाकी गाड्यांची परस्पर विक्री करुन 11 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | जुन्या वाहनांची विक्री करण्यासाठी विश्वासाने दिलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांची परस्पर विक्री करुन 11 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth Pune) नरपतगिरी चौकातील (Narpatgiri Chowk) राज मोटर्स व शांती व्हिल्स या जुन्या चारचाकी व दुचाकी गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या विक्रीच्या दुकानात घडला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुरजप्रकाश हरिश्चंद्र गुप्ता खंडेलवाल (वय-60 रा. शांती निवास नेहरू मार्ग, घोरपडी गाव, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जुज्जर शब्बीर रामपुरवाला (रा. एम्रीरियल टॉवर्स, एन.आय.बी.एम. रोड, मोहम्मदवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Cheating Fraud Case Pune)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जुन्या चारचाकी व दुचाकी गाड्या विक्री करण्याचा व्यवसाय आहे.
फिर्यादी यांनी राज मोटर्स व शांती व्हिल्स या जुन्या गाड्या खरेदी विक्रीच्या दुकानातील मॅनेजर आरोपी जुज्जर रामपुरवाला याच्याकडे विश्वासाने चारचाकी व दुचाकी वाहने विक्रीसाठी दिली होती.
आरोपीने 9 दुचाकी आणि चार चारचाकी गाड्यांची परस्पर विक्री करुन मिळालेली रक्कम रोख आणि ऑनलाईन पद्धतीने
बँक खात्यात घेतले. आरोपीने फिर्यादी यांची 11 लाख 4 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून परदेशी महिलेची सुटका

Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, आशिष शेलारांनी घेतली भेट

Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; चिराग मुकेश निहलानी वर गुन्हा दाखल