Cheating Fraud Case Pune | सोनिटिक्स क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली एक कोटीची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांकडून वकिलाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | अभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी – Cryptocurrency) गुंतवणूक केल्यास 20 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने (Lure Of Good Returns) एक कोटी 10 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक केली आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पसार झाला होता. अखेर सायबर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे. वकिल संतोष पोपट थोरात Adv Santosh Popat Thorat (रा. खराडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे.

संतोष थोरात याने सोनिटिक्स नावाचे (Sonitix Exchange) अभासी चलन तयार करुन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास वार्षीक 20 टक्के परतावा देण्याचे आमिष नागरिकांना दाखवले. गुंतवणुकीच्या अनेक पटीमध्ये परतावा मिळण्याच्या अपेक्षेने फिर्यादीसह तक्रारदारांकडून 1 कोटी 10 लाख रुपये गुंतवले होते. मात्र, आरोपीने कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता फसवणूक केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Cheating Fraud Case Pune)

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी संतोष थोरात याने अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल क्रमांक बदलला.
राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलले. सायबर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणावरुन त्याचा माग काढून त्याला
बेड्या ठोकल्या. आरोपीला वाघोली परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

फसवणूक झालेल्यांनी सायबर विभागात तक्रार द्यावी

अभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करावी,
असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोनिटिक्स नावाचे अभासी चलनामध्ये ज्या-ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे
त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात यावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. (Shivaji Nagar Cyber Police Station)

ही कारवाई पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP RN Raje) यांच्या मार्गदर्शनासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील (PI Minal Supe Patil), संदीप मुंढे, संदीप पवार, दिनेश मरकड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)