Cheating Fraud Case Pune | पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे अमिष दाखवून 2 कोटींची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) केल्याने पुण्यातील एका व्यक्तीसह इतरांची दोन कोटी 30 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) एकावर एमपीआयडी कायद्यांतर्गत (MPID Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत बालेवाडी येथील मधुबन सोसायटीत (Madhuban Society Balewadi) घडला आहे.

याबाबत समाधान शंकर कदम (व-45 रा. बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निलेश भास्कर टिळे Nilesh Bhaskar Tile (रा. बालेवाडी) याच्यावर आयपीसी 406, 420 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Cheating Fraud Case Pune)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना दिले. आरोपीवर विश्वास ठेऊन फिर्यादी, त्यांच्या मित्रांनी वेळोवेळी दोन कोटी 29 लाख 75 हजार एवढी रक्कम आरोपीला दिली. पैसे घेतल्यानंतर आरोपीने गुंतवणुकदारांना कोणताही मोबदला न देता विश्वासघात केला.

गुंतवणुकदारांकडून घेतलेल्या रक्कमेचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैशाचा अपहार केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी व इतरांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली.
मात्र आरोपींनी पैसे परत न करता फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणुक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)