Check Books | 1 ऑक्टोबरपासून निरूपयोगी होतील ‘या’ तीन बँकांचे चेकबुक, तुमच्या बँकेची माहिती तपासून पहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Check Books | बँका मर्जर झाल्यानंतर ग्राहकांना सिस्टम समजून घेण्यास वेळ देण्यात आला होता. त्यानंतर मर्जर झालेल्या बँकांचे चेकबुक (Check Books) आणि आयएफएससी कोड बदलले होते. आता पुन्हा या बँकांमध्ये एक महत्वाचा बदल होणार आहे. देशातील तीन बँकांचे दुसर्‍या बँकांमध्ये मर्जर झाले आहे. ज्यामुळे त्यांच्या चेकबुकमध्ये बदल होत आहेत. एक ऑक्टोबरपासून या बँकांच्या चेकबुकमध्ये बदल होईल.

या बँकांचे चेक होतील निरुपयोगी

अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचे चेक बदलणार आहे.
एक ऑक्टोबरपासून चेकबुक आणि एमआयसीआर कोड निरुपयोगी होतील.

अलाहाबाद बँकेचे मर्जर इंडियन बँकेत झाले, जे 1 एप्रिल 2020 पासून प्रभावी आहे.
तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झाले होते, जे 1 एप्रिल 2019 पासून प्रभावी आहे.

ट्विट करून दिली होती माहिती

इंडियन बँकेकडून ऑगस्ट महिन्यात ट्विट करून माहिती दिली होती की, अलाहाबाद बँकेचे एमआयसीआर कोड आणि चेकबुक केवळ 30 सप्टेंबर 2021 पर्यंत चालतील त्यानंतर त्यांना अमान्य घोषित केले जाईल. ग्राहकांनी 1 ऑक्टोबर 2021 च्या अगोदर नवीन चेकबुक घेतले पाहिजे.

इंडियन बँकेनुसार, ग्राहक नवीन चेकबुक जवळच्या ब्रँचमधून घेऊ शकतात किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे अप्लाय करू शकतात.
पीएनबी बँकेने सुद्धा अशाच प्रकार ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबर 2021 पासून चालणार नसल्याचे म्हटले आहे.

 

Web Title : Check Books | checkbooks of these three banks will become useless from october 1 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Rape Case | ‘मी ACP आहे, माझं कोणी काही करु शकत नाही’, असं म्हणत 38 वर्षाच्या शिक्षिकेवर बलात्कार

Pune BMW Accident | पुण्यातील सेनापती बापट रोडवर भरधाव बीएमडब्ल्युच्या धडकेत पादचारी मंडल अधिकारी महिलेचा मृत्यु

Post Office | पोस्ट ऑफिस सुद्धा देते करोडपती बनण्याची संधी, दररोज करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक; जाणून घ्या