Gold Rates Today : सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीला मात्र झळाळी, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफ बाजारामध्ये मंगळवारी (दि. 19) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Gold Price) सोने दरात घसरण झाली आहे. सकाळी फेब्रुवारीसाठीच्या सोन्याच्या वायदे किंमतीत 18 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,876 रुपायांवर पोहचली आहे. तर चांदीच्या फ्यूचर ट्रेडिंगमध्ये 356 रुपयांची वाढ झाली आहे. या तेजीनंतर भाव 65,785 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 48,215 रुपये प्रति तोळा होते. तर चांदी 64,116 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

दिल्लीत या दराने सुरु झाला व्यवहार :
22 कॅरेट गोल्ड – 47660 रुपये प्रति तोळा
24 कॅरेट गोल्ड – 51990 रुपये प्रति तोळा
चांदीचे दर – 65600 रुपये प्रति किलो

सोमवारी काय होते दर ?
भारतीय सराफा बाजारात सोमवारी (दि. 18) सोन्याचे दर 117 रुपयांनी वाढले होते. यानंतर दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 48,332 रुपये होते. तर चांदीमध्ये 541 रुपयांच्या वाढीनंतर दर 64,657 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र तेजी
याशिवाय मंगळवारी जर आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत सांगायचे झाले तर या ठिकाणी तेजी दिसून आली. अमेरिकेत सोन्याचे दर 1.95 डॉलरच्या तेजीनंतर 1,838.33 डॉलर प्रति औंसवर आहेत. तर चांदीमध्ये याठिकामी 0.25 डॉलर्सची तेजी आली आहे. यानंतर चांदीचे भाव 25.21 डॉलर आहेत.