FACT CHECK : प्रत्येक कोविड -19 रूग्णाला सरकारकडून मिळणार दीड लाख रुपये ? जाणून घ्या पूर्ण ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोविड -19 साथीच्या आजाराची प्रकरणे सतत वाढत आहेत, दरम्यानच्या काळात या साथीसंदर्भातील सर्व दावे व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील काही दावे खरे आहेत तर काही पूर्णपणे खोटे आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार प्रत्येक कोविड-19 रुग्णासाठी नगरपालिकेला दीड लाख रुपये देत आहे. कोविड-19 च्या प्रत्येक रुग्णासाठी केंद्र सरकार मनपाला दीड लाख रुपये देत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे आणि यामुळे कॉर्पोरेशन आणि खासगी डॉक्टर सामान्य ताप आणि सर्दी असलेल्या रुग्णांना कोविड -19 चे रूग्ण असल्याचे सांगत आहे.

मराठीत व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये असा दावा केला आहे की, ‘केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे की, कोविड-19 च्या प्रत्येक रुग्णासाठी नगरपालिकेला दीड रुपये दिले जाईल, त्यामुळे लोकांना सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये म्हटले आहे की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘दावा: व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे, त्यात असे म्हटले आहे की, केंद्र सरकार कोविड -19 च्या प्रत्येक रुग्णासाठी दीड लाख रुपये महापालिकेला देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक: हा दावा बनावट आहे, अशी कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही. कोविड -19 च्या साथीच्या 3,100,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद भारतात झाली आहे.