बदलली बाईकवर मागे बसण्याची पद्धत ! आता असा करावा लागेल प्रवास, जाणून घ्या काय आहेत सरकारचे नियम

नवी दिल्ली : वाढणारे रस्ते अपघात लक्षात घेऊन आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी गाड्यांची बनावट आणि त्यामध्ये मिळणार्‍या सुविधांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयाने सुरक्षा लक्षात घेऊन अनेक नियमात बदल केले आहेत. मंत्रालयाची नवी गाईडलाईन बाईक चालवणार्‍यांसाठी जारी केली आहे. या गाईडलाईनमध्ये सांगण्यात आले आहे की, बाईक चालकाच्या मागे बसणार्‍या लोकांना कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल. या नियमांबाबत जाणून घेवूयात.

1. ड्रायवरच्या सीटच्या मागे हँड होल्ड
मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार बाईकच्या मागे सीटच्या दोन्हीकडे हँड होल्ड आवश्यक आहे. हँड होल्ड मागे बसलेल्या प्रवाशाच्या सुरक्षेसाठी आहे. बाईक चालकाने अचानक ब्रेक मारण्याच्या स्थितीत हँड होल्ड खुप उपयोगी ठरतात. अजूनपर्यंत बहुतांश बाईकमध्ये ही सुविधा नव्हती. यासोबतच बाईवर मागे बसणार्‍यासाठी पाय ठेवण्याची जागा बंधनकार करण्यात आली आहे. याशिवाय बाईकच्या मागील चाकाच्या डाव्या भागातील अर्धा भाग सुरक्षित प्रकारे कव्हर असेल, जेणेकरून मागे बसणार्‍याचे कपडे चाकात जाणार नाहीत.

2. हलका कंटेनर लावण्याचे दिशानिर्देश
मंत्रालयाने बाईकमध्ये हलका कंटेनर लावण्याचे सुद्धा दिशानिर्देश जारी केले आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रूंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीपेक्षा जास्त नसेल. जर कंटेनर मागील प्रवाशाच्या ठिकाणी लावला गेला तर केवळ चालकालाच मंजूरी असेल. म्हणजे दुसरा प्रवाशी बाईकवर बसणार नाही. जर मागील प्रवाशाच्या ठिकाणी खाली लावल्यास दुसर्‍या व्यक्तीला मागे बसण्यास परवानगी असेल.

3. टायरबाबत सुद्धा नवीन गाईडलाईन
नुकतीच सरकारने टायरबाबत सुद्धा नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या अंतर्गत कमाल 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमची सूचना दिली आहे. या सिस्टममध्ये सेन्सरद्वारे चालकाला ही माहिती मिळते की, गाडीच्या टायरमधील हवेची स्थिती काय आहे. यासोबतच मंत्रालयाने टायरच्या दुरूस्तीच्या किटची सुद्धा आावश्यकता सांगितली आहे. हे लागू झाल्यानंतर गाडीत एक्स्ट्रा टायर लावण्याची गरज असणार नाही.