‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये ‘सुंदरा’ अन् ‘सुंदरा’चाच ‘बोलबाला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट असलेला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पुर्ण चित्रपटाचा अंदाज लावतो. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागावी म्हणून निर्मात्याने याचे पहिले गाणे रिलीज केले. त्यामुळे चित्रपट पाहण्याती उत्सुकता प्रेक्षकांना खूप लागली आहे. गाण्याआधी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली होती. प्रेक्षकांसाठी ट्रेलरनंतर चित्रपटाचे गाणे प्रदर्शित करण्यात आले. ट्रेलरमधून सईची झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली.

 

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायचे झाले तर एखाद्या स्त्रीला आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी तडजोड ही करावीच लागते. तिची तडजोड कधी आपल्या नात्यासाठी तर कधी आपल्या अस्तित्वासाठी असते आणि आयुष्य म्हणले तर त्यामध्ये नाती, त्यांची गुंतागुत, विचार हे सर्व असते आणि यांना सामोरी जाते ती म्हणजे एक स्त्री व या स्त्रीची भूमिका अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

या चित्रपटाचे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. ‘सुंदरा मनामध्ये भरली…’ हे गाणे प्रेक्षकांना पहायला मिळाले. अजय गोगावलेचे हे गाणे प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाले. अजय गोगावलेचे प्रत्येक गाणे प्रेक्षकांच्या काळजाला भिडते आणि हे ही गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. गाण्याचे बोल सिनेमाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी लिहले आहे.

त्याचबरोबर गाण्याचे संगीत दिग्दर्शन ही त्यांनीच केले आहे. त्यांच्यासोबत चैतन्य अडकर यांनीसुद्धा गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे. याची सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निंरजन अल्पे यांनी केली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रशांत गोखले आहे. हा चित्रपट २२ नोहेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार