अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

मुंबई : वृत्तसंस्था – एसटीएस अधिकाऱ्याची भूमिका असलेला अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाले आहे. अक्षयचा हा चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित करणार आहे. रोहितने ‘सिम्बा’ चित्रपटात ‘सूर्यवंशी’ची एक झलक दाखवली होती. ही झलक पाहिल्यानंतर ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक पाहण्यास चाहते उत्सूक होते. या चित्रपटानिमित्त अक्षय आणि रोहित पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.

अनेक चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारणारा अक्षय या चित्रपटातही एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात दहशतवादा विरोधात तो लढताना दिसणार आहे. पण चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोण हिरोईन असणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मध्यंतरी अक्षयने या चित्रपटासाठी पूजा हेगडेचे नाव सुचवले असल्याची बातमी होती परंतु यावर अधिकृत घोषणा झालेली नाही.

अक्षयचा हा चित्रपट एका साऊथ सिनेमाचा रिमेक असल्याचेही मानले गेले होते. यावर रोहित शेट्टी प्रचंड संतापला होता. यावर रोहित म्हणाला होता’ ‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते.

अक्षयसोबत या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगण देखील झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून २०२० च्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.