काय सांगता ! होय, दहावीत तब्बल 93 % मिवणार्‍या विद्यार्थीनीला NEET परीक्षेत ‘भोपळा’

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईनः वैद्यकीय क्षेत्रातील प्रवशासाठी घेतलेल्या नीट परीक्षेचा (NEET result) निकाल 16 ऑक्टोंबरला जाहीर झाला. त्यात ओडीशाचा शोएब आणि दिल्लीच्या आकांक्षा सिंह यांनी 720 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवला. मात्र या परीक्षेत अमरावती येथील विद्यार्थीनी वसुंधऱा भोजने हीला शून्य गुण मिळाले आहेत. आपला हा निकाल पाहून तीने आश्चर्य व्यक्त करत उच्च न्यायालयात ( high court) धाव घेतली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर व न्यायमूर्ती एन. बी. सुर्यवंशी यांनी नीट परीक्षा आयोजक एनटीएला ((NTA- National Testing Agency ) नोटीस जारी केली असून याबाबत 26 ऑक्टोंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोंबर रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावती येथील विद्यार्थीनी वसुंधऱा भोजने हीला 720 गुणापैकी पैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले. तिच्यासाठी हा निकाल धक्कादायक होता. तीने गेल्या वर्षभरापासून नीटची तयारी केली होती. तसेच कुशाग्र बुध्दीमता असलेल्या वसुंधराचा हा निकाल पाहून तिच्या आई- वडीलांसह शिक्षकांनाही विश्वास बसेना. त्यामुळे त्यांनी एनटीएकडे रितसर निवदेन देवून वस्तुस्थिती कथन केली. पण अद्याप कोणतेही उत्तर अथवा पत्रव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही.

वसुंधरा ही हूशार असून तीला दहावीत 93 टक्के तर बारावीत 81.85 टक्के मिळाले होते. त्यामुळे तीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याने तीने नीटची परीक्षा दिली होती. या परिक्षेत तीला 600 गुण मिळतील,अशी अपेक्षा होती. निकालात काही तांत्रिक घोळ निर्माण झाल्याने कदाचित शून्य गुणांची नोंद झालेली असावी. या परीक्षेसंदर्भात पुर्नमुल्यांकन आणि पुन्हा पेपर तपासण्याची तरतूद नसल्याने ओएमआर शीटच्या आधारे दिलासा मिळणे शक्य होते. त्या संदर्भात एनटीएला निवेदन दिले आहे. पण त्यावर अद्यापही उत्तर न आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने व्हीसीद्वारे सुनावणी करत एनटीएला नोटीस जारी केली असून दि. 26 ऑक्टोंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील 4 जण टॉप 50 मध्ये
राज्यातील आशिष झान्टये याने 710 गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. तर तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे यानी 705 गुण मिळवून राज्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वाधिक गुण मिळवणा-या 50 विद्यार्थ्यांमध्ये उपरोक्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे.