पेट्रोल अन् डिझेलचे दर गाठताहेत विक्रमी पातळी, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाचे संकट त्यातच महागाईच्या झळा सोसत असतानाच आता इंधन दरवाढीचे चटके सर्व सामान्य नागरिकांना सोसावे लागत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका संपताच इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. दिवसेंदिवस देशात इंधनाचे दर विक्रमी पातळी गाठत आहेत. मार्च-एप्रिलमध्ये किरकोळ इंधन दरात वाढ झाली नाही मात्र आता मे मध्ये एकूण १० दिवस तेलाच्या किंमती वाढविण्यात आल्या. देशातील मेट्रो शहरात विक्रमी दराने इंधनाची विक्री होत आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २७ पैसे आणि डिझेलच्या किंमती २९ पैशांनी वाढ झाली होती. मात्र आज इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

प्रमुख शहरातील इंधन दर
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली ९२.८५ ८३.५१
मुंबई ९९.१४ ९०.७१
कोलकाता ९२.९१ ८६.३५
चेन्नई ९४.५४ ८८.३४

मे महिन्यात झालेली इंधन दरवाढ
पाच राज्यातील विधानसभा निवडणूक संपताच इंधन दरवाढ होऊ लागली. मे महिन्यात आतापर्यंत दहा वेळा इंधनाच्या किंमती वाढल्या असून पेट्रोल २ रुपये ५० पैशांनी महागले आहे तर डिझेल २ रुपये ७८ पैशांनी महागले आहे. मार्च महिन्यापेक्षा मंगळवारी क्रूडच्या किंमती अधिक होत्या. १५ मर्चंनंतर प्रथमच ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ७० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली होती. त्यानंतर काल वाढ झाली होती. परंतु आज किंमती स्थिर आहेत. दहा दिवसाच्या वाढीनंतर बऱ्याच राज्यात पेट्रोलने शंभरी गाठली होती.

मंगळवारी झालेल्या इंधन दरवाढीननंतर मुंबईतील किंमतही १०० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत आता पेट्रोल प्रतिलिटर ९९.१४ रुपये तर डिझेल प्रतिलिटर ९०.७१ रुपये झाले आहे. प्रत्येक राज्यात इंधन दर वेगळे असतात व्हॅट आणि फ्रेट शुल्कासारख्या स्थानिक करांमुळे इंधन दरात फरक पडतो. पेट्रोलवर सर्वाधिक मूल्य वर्धित कर (व्हॅट) राजस्थानमध्ये लादला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १०३.८० रुपये आणि ९६.३० रुपये प्रति लिटर विकले जात आहेत.

तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर कसे कराल चेक ?
क्रूड तेलाच्या किमती आणि परकीय चलनाच्या दरानुसार देशातील इंधन दर बदलत असतात. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता देशातील इंधन दर सुधारित होतात. देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर हे सुधारित दर सकाळी सहा वाजलेपसून लागू होतात. दरम्यान, फोन वरूनही इंधनाचे सुधारित दर आपण जाणून घेऊ शकतो. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.