Coronavirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये हॅकर्सची ‘चांदी’, 2 आठवडयात 4 लाखाहून जास्त सायबर अटॅक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सगळं जग एकत्र येऊन कोरोना विषाणूशी लढण्याचा कसून प्रयत्न करत आहे. पण त्याच संधीचा गैरफायदा घेत सायबर हॅकर्सनी मात्र आपले हल्ले वाढवले आहेत. सगळ्या यंत्रणा कोरोनाच्यामागे लागल्याने या हॅकर्सनी आयती संधीच मिळाली आहे आणि ते त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. चेक पॉइंट या संशोधन करणाऱ्या कंपनीच्या नव्या अहवालातून असं स्पष्ट झालं आहे की गेल्या दोन आठवड्यांत 4 लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. WHO, UN, Microsoft,Google या कंपन्यांच्या नावांचा आधार घेऊन हॅकर्स लोकांना लुटत आहेत. गेल्या दोन आठवड्यांत भारतातच नाही तर संपूर्ण जगात व्हायरसशी संबंधित 20 हजार डोमेन रजिस्टर झाले आहेत. Corona Cure, Corona post, Corona felief Fund आणि Corona crisis या नावांनी डोमेन रजिस्टर करण्यात आले आहेत. यापैकी 15 टक्के डोमेनबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही डोमेन रजिस्टर करून वेगळेच धंदे केले जात आहेत.