Petrol Diesel Prices : घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेक करा पेट्रोल-डिझेलचे दर, सलग 9 व्या दिवशी पुन्हा वाढले दर

मुंबई : लागोपाठ नवव्या दिवशी आजसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 83.17 रूपये प्रति लीटर तर डिझेल 73.21 रूपये प्रति लीटर झाले आहे. दिल्लीत पेट्रोल 48 पैशाने महागले आहे, आता ते 76.26 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लीटर 59 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेल 74.62 रुपये लीटर झाले आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधील दर पुढील प्रमाणे आहेत…

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 83.17 – 73.21
पुणे 82.40 – 71.28
ठाणे 82.29 – 71.15
अहमदनगर 83.36 – 72.31
औरंगाबाद 84.24 – 74.29
धुळे 82.90 – 71.77
कोल्हापूर 82.94 – 71.82
नाशिक 83.14 – 71.99
रायगड 82.48 – 71.32

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशात इंधनाचे दर सतत 82 दिवस स्थिर होते. देशभरात किमती वाढवण्यात आल्या आहेत आणि स्थानिक विक्री कर किंवा मुल्य संवर्धित कराच्या आधारे प्रत्येक राज्यात पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती वेगवेगळ्या आहेत.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता