ट्रेनचे लाईव्ह स्टेटस आता मिळणार व्हॉट्सअॅपवर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन  

ट्रेनचे लाईव्ह स्टेटस जाणून घेण्यासाठी आता १३९  क्रमांक डायल करायची गरज नाहीये किंवा कोणतेही अँप डाउनलोड करायची गरज नाहीये. आता ट्रेनचे लिव्ह स्टेटस आपल्या व्हॉट्सअॅपवरच मिळणार.

या याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, (आयआरसीटीसीने ) भारतीय रेल्वेने मेक माय ट्रिपसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला ट्रेनचं लाईव्ह स्टेटस मेसेंजरवरही मिळणार आहे. ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही समजणार आहे. याशिवाय पुढील स्टेशन कोणते आहे, कोणते स्टेशन येऊन गेले, याचीही माहिती मिळणार आहे.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’622b2fa6-8fda-11e8-a24c-a55444dfdeba’]

ट्रेनचे लाईव्ह स्टेटस व्हॉट्सअॅपवर पहाण्यासाठी 
तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करा, जेणेकरुन नवीन व्हर्जन तुम्हाला मिळेल. व्हॉट्सअॅपवर माहिती जाणून घेण्यासाठी मेक माय ट्रिपचा  ७३४९३८९१०४ हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल.व्हॉट्सअॅपमधून मेक माय ट्रिपचा क्रमांक ओपन करा. त्यामध्ये ट्रेनचा नंबर टाईप करुन मेसेज सेंड करा. मेसेज पाठवताच तुम्हाला हवे असलेल्या ट्रेनचे स्टेटस मिळेल.याच पद्धतीने पीएनआर नंबर व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. यामुळे तुम्हाला तुमच्या तिकिटाचे स्टेटसही मिळणार आहे.