घरबसल्या तपासा PAN कार्डाचे स्टेटस, ‘या’ आहेत काही सोप्या पद्धती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंटरनेटच्या या युगात पॅन कार्ड संबंधी सर्व कामे करणे अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या देखील तुमच्या पॅन कार्ड संदर्भातील माहिती मिळवू शकता किंवा अपडेट करु शकता. ऑनलाइन पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही पॅनकार्डच्या वेबसाईटवरुन पॅन कार्ड ट्रॅक करु शकता. जाणून घ्या ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड स्टेटस कसे तपासू शकता.

PAN किंवा UTI वेबसाीटवरून कुपन क्रमांक वापरुन तपासा पॅन कार्डचे स्टेटस
सुरुवातीला www.trackpan.utiitsl.com/PANONLINE/#forward या वेबसाईटवर जा
– त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाका
त्यानंतर पुढील स्टेजमध्ये तुमचा जन्मतारीख टाका
त्यानंतर येणारा Captcha Code टाका
त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड संदर्भातील महिती उपलब्ध होईल.

मोबाईल क्रमांकाने तपासा PAN कार्डचे स्टेटस
तुमच्या पॅनकार्डचे स्टेटस तुम्ही मोबाईल क्रमांकाच्या मदतीने देखील तपासू शकता. रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून 020-27218080 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तुम्ही तुमच्या पॅनकार्डचे तपासू शकता. 15 अंकी acknowledgement सांगून तुम्ही तुमच्या पॅनकार्डचे स्टेटस तपासू शकता.

SMS च्या माध्यमातून तपासा स्टेटस
तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून देखील तुमच्या पॅनकार्डचे स्टेटस तपासू शकता. तुम्हाला 15 अंकी acknowledgement क्रमांक NSDLPAN असे टाईप करुन 57575 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड संदर्भातील माहिती SMS वर उपलब्ध होईल.

आधार कार्ड वापरुन तपासा पॅन कार्डचे स्टेटस
आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा
त्यानंतर Check Pan Status या पर्यायावर क्लिक करा
यानंतर पुढील पेज ओपन झाल्यानंतर तुमचा 12 आकडी आधार क्रमांक टाका
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक Captcha Code येईल. हा कोट टाकल्यानंतर पुढे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड संदर्भातील माहिती मिळेल.

नाव आणि जन्मतारीख वापरून तपासा पॅन कार्डचे स्टेटस
Verify your PAN Details या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर दुसरे पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा. उदा. नाव, जन्मतारीख इत्यादी
त्यांनंतर तुम्ही अप्लिकेबल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे एक Captcha Code येईल.
हा कोड टाकून पुढे सबमिट केल्यानंतर तुमच्या पॅन कार्ड संदर्भातील माहिती तुम्हाला मिळेल.