आता ॲपद्वारे चेक करा ‘पीएफ’ खात्याचा बॅलन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) म्हणजे जीव की प्राणच. पीएफध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे. नियमित जमा होत आहे की नाही आदी माहिती मिळवणे आता मोबाईलद्वारे मिळवणे खूपच सोपे झाले. यासाठी एक नवीन ॲप आले आहे. ‘उमंग’ या सरकारी ॲपवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲप व्यतिरिक्त मिस्ड कॉल देऊन किंवा एसएमएस करून प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक प्राप्त करता येते.

ॲपद्वारे असा पाहा तुमचा पीएफ –

प्ले स्टोअरमधून उमंग ॲप डाउनलोड करा

फोन नंबर रजिस्टर करा आणि ॲपवर लॉगिन करा

वर डावीकडच्या कोपऱ्यात सर्व्हिस डायरेक्ट्रीमध्ये जाऊन ॲपवर लॉगिन करा

इपीएफओ शोधून त्यावर क्लिक करा

व्हियू पासबूकमध्ये जाऊन युएन नंबर टाइप करा. नंतर मोबाइलवर आलेल्या ओटीपीच्या साहाय्याने पासबूक उघडता येईल.

एसएमएसद्वारे असा चेक करा पीएफ – एसएमएस पाठवूनही ‘ ईपीएफओ ’च्या खात्यातील रक्कम समजून घेता येईल. त्यासाठी सभासदांनी ०७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. ही सुविधा अशांसाठीच आहे, ज्यांनी यूएएन सेवा सुरू केली आहे. एसएमएस पाठवताना मेसेज बॉक्समध्ये ‘EPFOHO UAN’ असे टाइप करून ज्या भाषेत माहिती हवी आहे, त्या भाषेची पहिली तीन अक्षरे लिहिणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, मराठीत माहिती हवी असेल तर, ‘EPFOHO UAN MAR’ असे लिहून ०७७३८२९९८९९वर एसएमएस पाठवावा. ही सेवा इंग्रजी, हिंदी,पंजाबी समवेत १० इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे.

मिस-कॉल देऊन चेक करा पीएएफ – मोबाइल फोनद्वारे मिस्ड कॉल देऊनही आता पीएफची शिल्लक जाणून घेता येईल. त्यासाठी ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून केवळ मिस्ड कॉल देण्याची गरज आहे. मिस्ड कॉल देण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलाच मोबाइल क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. एकदा मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच एसएमएस येईल, ज्यामध्ये शिल्लक रकमेची माहिती असेल.