‘चियरलीडर’ असणार्‍या आईनं स्वतःच्या मुलाला घरामागेच ‘पुरलं’, सांगितलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील ओहियोमध्ये एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या नवजात मुलाची हत्या करून घराच्या मागे त्याचा मृतदेह गाडल्याचा आरोप या महिलेवर करण्यात आला आहे. 20 वर्षीय बीएस रिचर्डसन या महिलेवर हा आरोप करण्यात आला होता. मात्र कोर्टाने तिला निर्दोष मुक्त केले आहे.

चिअरलिडर्सचे काम करणाऱ्या बीएस रिचर्डसन या महिलेवर आरोप करण्यात आला होता कि, तिने आपल्या घरातील बाथरूममध्ये मुलाला जन्म दिला होता. त्यावेळी तिने पोलिसांना सांगितले कि, जन्माला आलेले मूल हे मृत होते. मात्र पोलिसांनी तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र हत्या प्रकरणात तिला निर्दोष सोडण्यात आले असले तरी तिच्यावर मृतदेहाची योग्य विल्हेवाट न लावल्याने तिच्यावर 3 वर्ष लक्ष ठेवण्यात येणार आहे. एका युवकाबरोबर नात्यात असल्याने ती गरोदर राहिली होती. मात्र त्यांनी कुणालाही याची कल्पना दिली नव्हती.

दरम्यान, मे 2017 मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर त्याला गाडून टाकण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी एका डॉक्टरला त्यांनी याविषयी सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात या महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –