Cheese खाल्ल्याने आरोग्याला होतात असंख्य फायदे, असा करा डेली डाएटमध्ये समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cheese | दूध (Milk) आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी अनेकदा खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण दूध हे पूर्ण अन्न आहे आणि त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. असेच एक डेअरी प्रॉडक्ट म्हणजे चीज (Cheese) आहे. याचा वापर सँडविच, पास्ता, पिझ्झा आणि बर्गरमध्ये (Sandwich, Pasta, Pizza, Burger) केला जातो. बरेच लोक ते हानिकारक मानतात, परंतु हे आरोग्यासाठी फायदेशीर देखील ठरू शकते कारण त्यात कॅल्शियम आणि प्रोटीन (Calcium, Protein) भरपूर प्रमाणात असते. याव्यतिरिक्त, त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील कमी आहे (How To Eat Cheese).

 

चीज खाण्याचे फायदे
आपल्यापैकी अनेकांना कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो, त्यांच्यासाठी चीज खाणे चांगले आहे. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितले की, चीज खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात.

 

चीज कसे खावे
चीज अनेक प्रकारे खाता येऊ शकते, परंतु आपण बॅलन्स डाएट म्हणून सेवन केल्यास ते अधिक चांगले आहे. यासाठी योग्य प्रमाणात क्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंटचे असणे आवश्यक आहे. ते कसे खाणे योग्य ठरेल ते ते जाणून घेऊया. (Cheese)

1. जर तुम्हाला नियमित सलाड खाण्याची आवड असेल तर तुम्ही त्यात चीज घालून चव वाढवू शकता. यासाठी टोमॅटो, काकडी, कांदा, मुळा क्यूबच्या आकारात कापून घ्या आणि नंतर त्यात चीज मिसळा.

2. प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही अनेकदा अंडी खाता, यात चीज मिक्स करू शकता. हा एक हेल्दी नाश्ता तयार होईल, जो शरीराचे पोषण करेल आणि जिभेला चव देईल.

3. आपण अनेकदा नाश्त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खातो, यात चीज घालून टेस्ट करा, तुम्हाला ते नक्कीच आवडेल.

4. सकाळच्या नाश्त्यात सँडविच खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे, त्यात चीज घातल्यास चव खूप वाढते आणि दिसतेही सुंदर.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cheese | cheese eating benefits on our body how to intake salad sandwich bread paratha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत

 

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटची तब्बल 1 कोटींची फसवणूक

 

Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!