‘बिग बी’ अमिताभच्या ‘चेहरे’साठी अभिनेत्रीचा शोध सुरू, ‘या’ दोघींना केला ‘अप्रोच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांच्या चित्रपटासाठी कृतिला कास्ट करण्यात आले होते पण आता कृती या चित्रपटातून बाहेर पडल्याचे समजले आहे. असं म्हणतात की, हा चित्रपट तिच्या चुकांमुळे कृतिच्या हातातून गेला आहे. तिला हा चित्रपट गमावावा लागला. अभिनेत्री कृति खरबंदाने चित्रपट ‘चेहरा’ सोडल्यानंतर बॉलिवूडमध्ये बरीच खळबळ उडाली आहे. एकीकडे कृति बाहेर पडल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर दुसरीकडे निर्माते दुसर्‍या अभिनेत्रीचा शोध घेत आहेत.

View this post on Instagram

👊🏻👊🏻👊🏻

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda) on

या भूमिकेसाठी अभिनेत्री अंकिता लोखंडे कास्ट करण्याची चर्चा चालू आहे, जरी तिने अद्याप ऑफर पेपरवर सही केली नसली तरी तिने तोंडी सहमती दिली आहे. मात्र, आता चित्रपट ‘चेहरा’ साठी आणखी दोन अभिनेत्रींविषयी चर्चा असल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

And I don’t give a damn 😉

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा आणि मौनी रॉय या दोघींनी चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांची भेट घेतल्याचे समजले आहे. याशिवाय ‘सिक्रेड गेम्स’मध्ये काम करणारी अभिनेत्री एलनाज नौरोजी हीचे नावही या चित्रपटासाठी समोर आले आहे. आता यांपैकी कोणती अभिनेत्री कृति खरबंदाची भूमिका साकारताना दिसणार आहे, ही वेळच सांगेल.

असे मानले जाते की, कृति खरबंदा चित्रपट ‘चेहरा’ सोडण्याचे कारण एक इंटिमेट सीन होता. त्यात तिला लिपलॉक करायचे होते. या सीनमध्ये कृतिला एका अभिनेत्याशी इंटिमेट सीन करायचा होता. हा सीन कृतिला करण्याची इच्छा नव्हती. यानंतर तिने चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चा केली आणि बर्‍याच चर्चेनंतर तिने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.

क्रृतिच्या आडमुठेपणामुळे तिला चित्रपट ‘चेहरा’ मधून काढून टाकण्यात आले. मात्र, चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी नंतर ट्विट केले की, कृति आणि चित्रपटाच्या निर्मात्यांच्या परस्पर सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like