रिया चक्रवर्तीच्या ‘चेहरे’साठी लागली मोठी बोली ! ‘या’ कारणामुळं Hotstar नं मोजले कोट्यावधी रुपये ?

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा गुलाबो सिताबो हा सिनेमा 11 जून 2020 रोजीच रिलीज झाला होता. आता बिग बींचा आणखी एक सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. अशी माहिती आहे की, बिग बी यांच्या आगामी चेहरे (Chehre) या सिनेमासाठी हॉटस्टार (Hotstar) नं मोठी रक्कम मोजली आहे. याचं कारण आहे ते म्हणजे या सिनेमातील एक चेहरा.

चेहरे या सिनेमात अॅक्ट्रेस रिया चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सुशांतच्या निधनाननंतर रिया सोबत जे काही घडलं त्यामुळं रिया सतत चर्चेत राहिली होती. याचा फायदा आता मेकर्स उचलणार आहेत. आता प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळं सिनेमासाठीही तिच्या नावाचा फायदा होणार आहे. त्यामुळं आता चेहरे सिनेमासाठी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनं मोठमोठी बोली लावली. यात हॉटस्टारनं बाजी मारली आहे. हॉटस्टारनं सिनेमासाठी मोठी रक्कम मोजली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार चेहरा हा सिनेमा आता हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. आधी हा सिनेमा 24 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. परंत लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नव्हतं. अद्यापही सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.

चेहरे सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, रिया चक्रवर्ती, कृती खरबंदा, सिद्धांत कपूर आणि अन्नू कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.