मुंबईतील ‘या’ भागात पुन्हा लॉकडाऊन ?, ‘कोरोना’ रुग्णांची संख्या वाढतेय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असताना मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील एम पश्चिम प्रभागांतर्गत येणाऱ्या चेंबूर, टिळक नगरसह आसपासच्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर या भागात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच सरासरी 30 नवीन रुग्ण सापडत आहेत. तर, जानेवारी ही संख्या 10 ते 15 इतकी होती.

पालिकेने त्यांच्या क्षेत्रात असलेल्या सोसायट्यांना नवीन कोविड नियम जारी करुन या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच खबरदारी घेण्यास सांगितले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर या भागात पुन्हा लॉकडाऊन होण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, एम पश्चिम प्रभागातील कोरोना वाढीचा दर 0.28 टक्क्यांवर पोहचला असून संपूर्ण मुंबईचा दर 0.14 टक्के आहे. वॉर्ड अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका कुटुंबातील सहा ते सात लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, राज्य सरकारने लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला. तसेच बाजारात गर्दी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने हा संसर्ग वाढत आहे. लोकांकडून कोविड नियमांचे पालन केले जात नसल्याने संसर्ग पसरत आहे. यासह समारंभ आणि विवाहानंतर संसर्ग वाढल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

एम पश्चिम वॉडचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भूपेंद्र पाटील यांनी सांगितले की, चेंबूर, टिळकनगर, सिंधी कॉलनी आणि इतर भागातील बाजारपेठेत दररोजच्या वस्तू खरेदीसाठी नागरिक जात आहेत. यामुळे या ठिकाणी गर्दी होत आहे. सपरस्प्रेडर होऊ नये यासाठी फेरीवाले आणि दुकानदारांची कोरोना तपासणी सुरु केली आहे. दोन दिवसांत नवीन प्रकरणे किती येतात हे पाहिले जाईल. मात्र, पुढच्या आठवड्यातील प्रकरणे पाहिल्यानंतर एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचू शकतो.

सोसायट्यांसाठी नवी नियम

–  दूध विक्रते व नोकरांचे तापमान तपासून सोसायटीत प्रवेश द्यावा

–  जर एखाद्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटीव्ह आल्यास संपूर्ण कुटुंबास 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागेल.

–  कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची टेस्ट केली जाईल.

–  पॉझिटीव्हि व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल.

–  सोसायटींना या नवीन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.