‘नपुंसक’ करण्याचे देणार इंजेक्शन, अमेरिकेतील ‘या’ राज्यात बलात्काऱ्यांना ‘कडक’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात महिलांवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. कितीही कडक शिक्षा असली तरी या घटनांमध्ये घाट होताना दिसत नाही. त्यामुळेच एक असे राज्य आहे ज्यांनी या आरोपींना जरब बसण्यासाठी एक महत्वाचा आणि अतिशय मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेतील अलाबामा या राज्यात यासाठी नवीन कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यात १३ वर्षांखालील मुलांवर लैंगिक अत्याचार केल्यास त्यांना नपुंसक करण्याचे इंजेक्शन किंवा औषध दिले जाण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या कायद्यात आरोपीना जामीन किंवा पॅरोलवर बाहेर सोडण्याआधी अशा प्रकारचे औषध किंवा इंजेक्शन दिले जाणार आहे. ज्यामुळे त्याची लैंगिक उत्तेजकता कमी होण्यास मदत होणार आहे. बाहेर आलेल्या रिपोर्टनुसार या इंजेक्शनचा प्रभाव हा कायस्वरूपी नसून काही कालावधीसाठी असणार आहे.

जामिनावर सोडण्याच्या एक महिना आधी आरोपीला हे इंजेक्शन देण्यात येणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याचा खर्च हा आरोपीकडूनच घेतला जाणार आहे. जो आरोपी हे इंजेक्शन घेणार नाही त्याला जेलमधून बाहेर सोडण्यात येणार नाही.

दरम्यान, कायद्यात अशी तरतुद करणारे अमेरिकेतील हे सातवे राज्य आहे, ज्यात फ्लोरिडा आणि लूसिआना या राज्यांचा समावेश आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

You might also like