पुणे – पंढरपूर महामार्गावर रसायनाचा टँकर उलटला

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) : पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच असून , गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास खासगी कंपनीचा रसायन घेऊन निघालेला टँकर उलटला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चैत्री वारीच्या वेळीच पालखी मार्गावर झालेल्या या अपघाताला प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ज्युबिलंट कंपीनीतील अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड घेऊन निघालेला टँकर ( जीजे १२ बी एएक्स१०७१ ) पुण्याच्या दिशेकडून जेजुरीकडे निघाला होता.

वाल्हे गावानजीक कामठवाडी येथे टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर अचानक पलटला. सुदैवाने हा अपघात घडला तेव्हा टँकरच्या आसपास कोणतेही वाहन नव्हते. टँकर उलटतोय हे लक्षात येताच चालकानेही उडी मारली त्यामुळे किरकोळ जखम वगळता चालकाला मोठी दुखापत झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अकुंश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे चौकीचे हवालदार हनुमंत गार्डी व समीर हिरगुडे यांनी एक बाजूने वाहतूक सुरळीत चालू केली होती.



कदाचित आग लागली तर उपाययोजना म्हणून अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावल्या होत्या.
पुणे ते जेजुरी हा पालखी मार्ग चार पदरी केला आहे. मात्र वारंवार अपघात होत असल्याने येथे अपघात कशामुळे घडताहेत याच अभ्यास करून त्यावर उपाययोजन करणे गरजेचे झाले आहे. एमआयडीसी ते नीरा या मार्गाच्या रुंदीकरणाची मागणी असूनही अनेक वर्षापासून मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे.

Visit : Policenama.com