रसायनशास्त्रच्या शिक्षकांची लग्नपत्रिका झाली व्हायरल… शशी थरूर यांनीही घेतली दखल 

वृत्तसंस्था – सध्या एका लग्नपत्रिकेची ट्विटरवर चांगलीच चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. केरळमधील एका जोडप्याच्या ही अजब गजब लग्नपत्रिका असल्याचं समजत आहे. दोघांमधील केमिस्ट्री या लग्नपत्रिकेतून दिसून येत आहे. याला कारणही तसंच आहे. या दोघांनी चक्क रासायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री या थीमवर आधारित लग्नपत्रिका छापली आहे. आणि आता ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. उल्लेखनीय बाब अशी की,  काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनाही या आगळ्यावेगळ्या पत्रिकेची भूरळ पडली असल्याचं समोर येत आहे.

सध्या सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकजण आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट करताना दिसत आहे. अशातच या आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेने सर्वांचे लग्न वेधून घेतल्याचे दिसत आहे. विथून शेखर आणि सूर्या नायर असं या वधू-वराचं नाव आहे. विशेष म्हणजे विथून आणि सूर्या दोघेही रसायनशास्त्राचे शिक्षक आहेत.

विथून शेखर आणि सूर्या नायर यांच्या लग्नपत्रिकेची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या या लग्नपत्रिकेत त्यांनी रसायनशास्त्रातील चिन्हे वापरली आहेत. म्हणजेच रसायनशास्त्रात सुत्रे लिहिताना किंवा एखाद्या रसायनाचे नाव लिहीताना त्याचे पहिले अक्षर वापरले जाते त्याचप्रमाणे Va बॉण्ड Sa असे चिन्हांमधून दाखवण्यात आले आहे. हे दोन्ही अणू एकमेकांशी जोडलेले दाखवण्यात आले आहेत.

‘विथून आणि सूर्या या दोन अणूंने आपल्या आई वडिलांच्या अॅक्टीव्हेशन एनर्जीच्या मदतीने मॉलिक्यूल होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाँडिंग समारंभासाठी सर्वांनी आपल्या प्रोडक्ट्ससहीत उपस्थित रहावे ही विनंती करत आहोत’ असे आगळेवगेळे आमंत्रण पत्रिकेत देण्यात आले आहे. तर पत्रिकेवरील इतर पानांवर केमिस्ट्रीने आम्हाला एकत्र आणले अशा आशयाचा मेसेज लिहीण्यात आला आहे. आधी ही पत्रिका सुर्यानेच फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर ही कल्पना अनेकांना आवडल्याने या पत्रिकेचे फोटो व्हायरल झाले.

महत्त्वाचे म्हणजे चक्क  शशी थरुर यांनीही या पत्रिकेचे फोटो रिट्वीट केले  आहे आणि या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  ‘या दोघांनाही वैवाहिक सुखी जिवनासाठी शुभेच्छा. दोघांमधील केमिस्ट्री अशीच राहो. तसेच फिजिक्सच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या भविष्यात हिटपेक्षा (वाईटापेक्षा) उजेड जास्त रहवो. आणि बायोजॉलिजच्या भाषेत सांगायचे तर उदार संतती प्राप्त होवो.’

https://www.facebook.com/soorya.nair.98/posts/10205415266258868

https://twitter.com/ShashiTharoor/status/1073161890623311872

बरं या पत्रिकेच्या प्रेमात फक्त थरुरच पडले असं नाही तर रसायनशास्त्र समजणाऱ्या अनेकांनी या पत्रिकेच्या कल्पनेचे कौतूक केले. जाणून घेऊयात याबद्दल काय म्हणाले नेटकरी…

म्हणून लग्न संध्याकाळी हवे

https://twitter.com/KhaaliPeeli1/status/1073343870635655168

त्यांना आयुष्यात स्टेबिलिटी लाभो

https://twitter.com/netanyahu12a/status/1073194508576149505

ही पाहा पत्रिका

https://twitter.com/KARTHIC_VINOBA/status/1073123152970956800

ट्विट वाचून छान वाटलं

https://twitter.com/trivediNaman12/status/1073239552851030016

केवळ लग्न नाहीतर रिअॅक्शन आहे

https://twitter.com/prasann_147/status/1073193381323403265

असाही या पत्रिकेचा अर्थ

https://twitter.com/sejoalzir/status/1073425884126707712

आजच या दोघांचे लग्न झाले असून दोघांनाही सुखी संसारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना दोघांमधील केमिस्ट्री अशीच कायम राहवो असंच नेटकरीही म्हणत असल्याचं दिसत आहे.