शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सारा आणि कार्तिकला ‘कास्ट’ करणार रोहित शेट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्गज बॉलिवूड चित्रपट निर्माते रोहित शेट्टी हे सध्या आपला आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून कॅटरिना कैफ ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रोहितच्या कॉप युनिव्हर्सचा हा चौथा चित्रपट असेल. चित्रपटात अक्षय एटीएस चीफची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहितच्या कॉप युनिव्हर्समधील सर्व सिनेमे हिट झाले आहेत पण यादरम्यान तो त्याच्या जुन्या काही चित्रपटांचे पुढील भाग बनवण्याचाही विचार करीत आहे.

रोहित शेट्टी यांनी नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सांगितले की, जर त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाचा दुसरा भाग कधी केला तर तो कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांना मुख्य भूमिकेत घेईल. कार्तिक आणि सारा लवकरच ‘लव आज कल 2’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत, जी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाली आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली करीत असून हा चित्रपट सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘लव्ह आज कल’ चा दुसरा भाग आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान व्यतिरिक्त रणदीप हूडा आणि श्वेता पड्डादेखील नव्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. कार्तिक आणि सारा आपल्या कारकीर्दीत खूप वेगवान प्रगती करत आहेत. कार्तिक आर्यनने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत, तर साराचे देखील सर्व चित्रपट हिट झाले आहेत.

सारा अली खानने आतापर्यंत जे चित्रपट केले आहेत त्या प्रत्येक चित्रपटात तिच्या कामाबद्दल तिचे कौतुक केले गेले आहे. जर रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात या दोघांना पुन्हा एकत्र पाहिले तर चाहत्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी असेल पण रोहित ‘चेन्नई एक्सप्रेस’चा दुसरा भाग बनवतात की नाही हे पाहावे लागेल.