#MissionPanni : चेन्‍नईतील नागरिकांकडून ‘या’ १० ‘भन्‍नाट’ आयडियांचा पाणी वाचवण्यासाठी अवलंब, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पाणी संकटाने त्रासलेल्या तमिळनाडूच्या चेन्नईतील लोकांनी या समस्येपासून निपटारा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सरकार आणि प्रशासन जेथे धोरणे आणि व्यवस्था कायम राखण्याचा विचार करत आहेत तेथे चेन्नईतील लोक पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चेन्नईतील लोक सध्या कशा प्रकारे या त्रासाचा सामना करत आहे हे पाहून देशातील इतर ठिकाणी पाणी नसलेल्या राज्यांनी आदर्श घेणे आवश्यक आहे.

गाड्या धुण्यासाठी ड्रायवॅश

ऑटोमोबाईल कंपनी रॉयल इनफिल्डने शहरात सर्व 20 सेंटरवर प्रत्येक महिन्याला 18 लाख लीटर पाणी वाचवण्याचा प्लॅन केला आहे. कंपनीने सांगितले की, 26 जूनला शहरातील सर्व सेंटरवर गाडी धुण्यासाठी पाण्याचा वापर बंद करण्यात येणार असून ड्रायवॅशचा वापर करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर इतर ऑटो मोबाईल कंपन्या देखील याचा विचार करत आहे. याशिवाय चेन्नईतील फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री देखील पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वर्क फ्रॉम होम
अनेक आयटी कंपन्यांनी त्याच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आवाहन केले आहे. ओल्ड महाबलीपुरम येथे आयटी कॉरिडोर आहे. येथील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम याचा पर्याय न देता ऑफिसच्या फक्त एका मजल्यावरील टॉयलेटचा वापर करावा असे सांगितले आहे आणि पाणी कमी वापण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर याच भागातील काही नागरिक घरात टायलेटमध्ये फ्लॅशसाठी वॉशिंग मशीन मधील पाण्याचा वापर करत आहे.

सिनेमातील पाण्याचे सीन बंद

जो पर्यंत पाण्याचे संकट आहे तो पर्यंत तमिळनाडूच्या सिनेमात पावसात भिजणारे आणि स्वीमिंग पूल मध्ये भिजून गाण्यात नाचणारे स्टॉर आता पाहता येणार नाही. अशा स्क्रिप्टवरच सिनेमे सध्या न बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिग बॉसमध्ये पाणी वाचवा



कमल हसन यांनी सांगितले की, सिने इंडस्ट्रीनंतर टीव्ही इंडस्ट्रीने देखील पाणी बचाव अभियानात योगदान दिले आहे. बिग बॉसचे होस्टींग करणारे कमल हसन यांनी बिग बॉसमध्ये असलेल्या कलाकारांना सांगितले आहे की, घरात स्विमिंग पूलचा वापर नसावा, स्पर्धकांना देखील सांगितले आहे की पाण्याचा जपून वापर करावा.

टब बाथ

पेरंबूर मध्ये राहणाऱ्या एंटनी राज आणि त्याच्या कुटूंबाने रोज टब बाथ पद्धतीने आंघोळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एक मोठा प्लास्टिक टब ते घेऊन आले आहेत. त्यात घरातील सदस्यांनी आंघोळ केल्यानंतर त्या पाण्याचा वापर टायलेटमध्ये फॅल्शसाठी करण्यात येतो. अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे.

आरओ ने पाण्याचा पुनर्वापर



आरओ मशीलमधून पिण्या योग्य नसलेले पाणी शुल्क राहते. त्याचा पुनर्वापर नागरिक घरातील कामासाठी करत आहेत. हे पाणी ड्रम मध्ये साचवून त्याचा वापर भांडे घासण्यासाठी आणि बागेत झाडांना पाणी घालण्यासाठी करण्यात येत आहे.

एसीतून पाणी



चेन्नईतील ओएमआर प्लेसमध्ये राहणाऱ्या एक विलातील रहिवाशाने एसीतून निघणारे पाणी साठवून त्याचा वापर गाड्या धुण्यासाठी आणि बागिच्याचे काम करण्यासाठी करण्यात येत आहे.

झाडांसाठी पाणी
दक्षिणेतील प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीप्रदा हिने जून महिन्यात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती की, ती वॉशिगमशीन मधून कपडे धूतल्यावर उरलेल्या पाण्याचा वापर झाडांना पाणी घालण्यासाठी करते एवढेच नाही तर आरओच्या शिल्लक पाण्याचा वापर देखील ती बगिचाच्या कामासाठी करते. तीच्या या पद्धती तिचे फॅन्स वापरुन पाहत आहेत.

डॉक्टरांची पाणी वाचवण्याच्या पद्धती
वेल्लूरच्या ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर कंडास्वामी सुब्रमणि यांनी आपल्या घराच्या कार पार्किंग खाली एक हौद बनवला आहे. या हौदातून दर वर्षी 60 हजार लीटर पाणी वाचवण्यात येते. या हौदात घराच्या टेरेस वरुन येणारे पावसाचे पाणी या हौदात साठते. आणि त्याचा ते वर्षभर वापर करतात.

आणि शाळेत इडली

काही शाळामध्ये सांगण्यात आले आहे की डब्या इडली आणावी आणि ते खाण्यासाठी काटे चमचे आणावे, हाताने जेवन करु नये. त्यामुळे हात धूतांना पाण्यात वापर करावा लागतो. अशाच प्रकारे सध्या ट्विटरवर पाणी वाचवण्याच्या काही सूचना फिरत आहेत.

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल