धक्कादायक ! चीनच्या कंपनीसोबत MS धोनीचा करार ? (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी यानं चीनच्या कंपनीसोबत करार केल्याचं दिसत आहे. आयपीएल सुरू होण्यापर्वीच काही दिवसांपूर्वीच ओपो या चीनच्या कंपनीनं धोनीसोबतचे काही व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. यामुळं आता धोनी चांगलाच ट्रोल होत आहे. सध्याच्या घडीला भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरणानंतर धोनी या कंपनीशी कसा काय करार करू शकतो असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत धोनीनं मात्र काहीही भाष्य केलेलं नाही.

ओपो या कंपनीनं काही व्हिडीओ ओपो इंडिया या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये धोनी दिसत आहे. करार झाल्याशिवाय कोणताही क्रिकेटपटू कंपनीच्या व्हिडीओत दिसत नाही. त्यामुळं धोनी आणि कंपनीचा करार झाला असेल. या कंपनीनं आयपीएलचं औचित्य साधून धोनीचे काही व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केले आहेत.

https://twitter.com/oppomobileindia/status/1306450305786277890?s=20

धोनीचं देशावर किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहित आहे. धोनी हा भारतीय आर्मीसोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरावाला गेला होता. भारतीय वायुदलानं धोनीला लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवीही दिली आहे. धोनी हा वायु दलातील पॅरा रेजिमेंट दलाच्या सरावात सहभागी होत असतो.