Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन : Chennai Super Kings (CSK) | टीम इंडियाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने या दरम्यान एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारण्याचा पराक्रमदेखील केला आहे. ऋतुराज गायकवाड सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याने 2021 मध्ये सर्वाधिक धावा ऑरेंज कॅप मिळवली होती. आता तर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अनेक सामन्यांमध्ये शतकी खेळी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Chennai Super Kings (CSK)

चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनीदेखील ऋतुराज गायकवाडचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले कि त्यांनी एमएस धोनीला खूप जवळून पाहिले आहे. ऋतुराज गायकवाड आणि एमएस धोनी यांच्यातील समानतेबद्दल बोलताना हसी म्हणाला, “साहजिकच त्याने धोनीला जवळून पाहिले आहे. ते इतरांपेक्षा लवकर गोष्टी समजून घेतात. तो एक स्वयंनिर्मित क्रिकेटपटू आहे आणि साहजिकच तुम्हाला मदतीची गरज आहे. गायकवाड इतर खेळाडूंपेक्षा शिकण्यात खूप चांगला आहे.” असे मायकल हसी म्हणाले आहेत.

ऋतुराज गायकवाड यांच्यात कर्णधारपदाचे गुण

(Rituraj Gaikwad) “ऋतुराज गायकवाडमध्ये कर्णधार बनण्याचे गुण आहेत. तो एक शांत खेळाडू आहे आणि आगामी काळात एक चांगला कर्णधार बनू शकतो.” असेदेखील मायकल हसी यावेळी म्हणाले.

ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी
136(112)
154*(143)
124(129)
21(18)
168(132)
124*(123)
40(42)
220*(159) in Quarter-final
168(126) in Semi-final

Naresh Mhaske | …यात शिवरायांचा अपमान नाही? नरेश म्हस्केंनी केली कविता

IPL 2023 | आता IPL मध्ये लागू होणार इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम; जाणून घ्या नियम