सावधान ! चेक बाऊंस झाल्यास तात्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे देताना चेक दिला तर तो आपण बँकेत जमा करतो. चेक देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात तेवढे पैसे असणे आवश्यक असते. आणि तेवढे पैसे त्या व्यक्तीच्या खात्यात नसतील तर बँक त्या चेकला रद्द करते आणि तो चेक बाउंस होतो.

चेक जेव्हा बाउंस होतो तेव्हा बँक त्यासोबत एक स्लिप देते. त्यात चेक बाउंस होण्याचे कारण दिले जाते. चेक बाउंस झाले तर चेक देणाऱ्याला एका महिन्याच्या आत कायदेशीर सुचना पाठवणे अपेक्षित असते. या सुचनेत दिलेला चेक बाउंस झाला आहे, असं सांगण्यात येते. त्यानंतर ती रक्कम देण्यासाठी त्याला १५ दिवसांची मुदत दिली जाते. त्यावर चेक देणाऱ्याला १५ दिवसांच्या आत पैसे द्यावे लागतात. त्याने १५ दिवसांत पैसे दिले तर हे प्रकरण तिथेच संपते. मात्र नाही दिले तर त्यावर कारवाई करता येते.

जर चेक देणाऱ्याने चेकची रक्कम दिली नाही तर त्यावर नागरी न्यायालयाअंतर्गत नोटीस पाठवण्यात येते. यात चेकची रक्कम बुडवणाऱ्या व्यक्तीला कलम १३८ नुसार २ वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकते. आणि दंडाची रक्कम ही चेकच्या रक्कमेच्या दुप्पट असू शकते. मात्र यात तुमची चुक असल्यास, तुम्ही केस हरलात तर जेवढे पैसे सुरुवातीला न्यायालयाने मिळवून दिले असतात तेवढे व्याजासहित पुन्हा द्यावे लागतात.

जस चेक बाउंस झाल्यावर आपण नागरी खटला भरवू शकतो तसंच कलम ४२० अंतर्गत गुन्हेगारी खटलाही भरवू शकतो. या अंतर्गत आपल्याला सिद्ध करावे लागते की चेक देणाऱ्याचा उद्देश आपल्यासोबत काही बेईमानी करण्याचा होता. हे सिद्ध झाल्यास आरोपीला ७ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड द्यावा लागतो.

चेक बाउंस होण्याची कारणे

१. जर चेक देणाऱ्याच्या खात्यात तेवढी रक्कम नसेल तर चेक बाउंस होतो

२. चेक देणाऱ्याच्या खात्यात चेकवरील रकमेपेक्षा कमी रक्कम असल्यास

३. चेकवर चेक देणाऱ्याची सही नसल्यास

४. चेक ज्याला द्यायचा आहे, त्याचे नाव नीट न टाकल्यास

५. चेकवर खाडाखोड केल्यासही चेक बाउंस होतो.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात