Cheslie Kryst Suicide | 60 मजली इमारतीवरून उडी मारून ‘या’ प्रसिद्ध मॉडेलनं केली आत्महत्या, टोकाचं पाऊल उचलण्यापुर्वी केली होती सोशल मीडियावर पोस्ट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Cheslie Kryst | इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार मानसिक ताणावामुळे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणीमुळे आत्महत्येला (Cheslie Kryst Suicide) बळी पडले आहेत. त्यात नुकतंच सोशल मीडियावर एका बातमीने धुमाकूळ घातला आहे. यूएसए मधील प्रसिद्ध मॉडेलनं आत्महत्या (Cheslie Kryst Suicide) केल्याचं उघडकिस आलं आहे.

‘मिस युएसए 2019 (Miss USA 2019)’ आणि अमेरिकेची मॉडेल चेल्सी क्रिस्टने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेल्सीनं 60 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Cheslie Kryst Suicide) केली आहे. तसेच आत्महत्या करण्याच्या आधी तिनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक पोस्ट ही शेअर केली होती. तसेच तिनं सोशल मीडियावर मानसिक आरोग्यावर बर्‍याचदा आपले मत स्पष्ट केलं आहे.

चेल्सी क्रिस्ट (Cheslie Kryst) 30 वर्षाची असून, अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मॅनहेटन येथे आत्महत्या करून तिनं स्वतःचा जीव संपवला. ती राहत असलेली बिल्डींग 60 मजल्याची असून नवव्या मजल्यावर तिचं घर होतं. कदाचित चेल्सीने 29 व्या मजल्यावरुन उडी मारली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चेल्सीनं 2019 मध्ये उत्तर कैरोलीनाचं प्रतिनिधित्व करत, ‘मिस युएसए 2019 (Miss USA 2019)’ चा ताज आपल्या डोक्यावर घेतला. ती पेशाने वकील असून दक्षिण आणि उत्तर कैरोलीना येथे ती वकिलीचा सराव करत होती. तसेच ‘मिस युएसए 2019’ झाल्यानंतर तिनं ‘एक्स्ट्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमांमध्ये ती मानसिक आरोग्यावर बोलायची. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मिस युनिव्हर्समध्ये (Miss Universe) भारताची हरनाज कौर सिंधू (Harnaaz Kaur Sandhu) जिंकली. तिच्यासोबत फोटोदेखील चेल्सीनं सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र आत्महत्या आधी तिने इंस्टाग्रामवर स्वतः पोस्ट केली. त्यामुळे तिच्या या पोस्टमुळं संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलं नाही.

 

 

Web Title : Cheslie Kryst Suicide | miss usa 2019 cheslie kryst passes away suicide jump

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’