हा ‘रायनो’व्हायरस काय आहे, ज्याच्या बाबत म्हटले जाते की, तो Corona ला पराभूत करू शकतो?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे तांडव सुरू आहे. सर्वप्रकारे त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दरम्यान दिलासा देणारा एक नवीन रिपोर्ट आहे. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कॉमन कोल्डवाला व्हायरस शरीरात प्रवेश करून कोरोना व्हायरसला मारू शकतो. सामान्य सर्दी-तापाच्या व्हायरसला रायनो व्हायरस म्हटले जाते. सध्या या रिपोर्टला दुजोरा मिळू शकलेला नाही परंतु जर असे झाले तर केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला दिलासा मिळू शकतो.

अशाप्रकारे काम करतो व्हायरस
व्हायरस सुद्धा मनुष्य किंवा पशुंप्रमाणेच काम करतो. ज्या प्रकारे आपण आवले स्थान निर्माण करण्यासाठी आपसात लढतो आणि स्वतःला सिद्ध करतो, तशाच प्रकारे व्हायरस सुद्धा होस्ट शरीरात प्रवेशासाठी लढतात आणि तोच व्हायरस जिंकतो, जो दुसर्‍या व्हायरसला मारतो. सर्दी-तापासाठी जबाबदार व्हायरस सुद्धा अशाच प्रकारे काम करतो.

वायरल लोड कमी होऊ शकतो
रायनो व्हायरस शरीरात घुसू शकले तर कोरोना व्हायरसचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणजे वायरल लोड कमी होईल. यातून हे होईल की, औषधांच्या मदतीने रूग्ण बरा होऊ शकतो आणि गंभीर स्थितीत जाण्याची भीती कमी होईल. हा रिसर्च जर्नल ऑफ इन्फेक्शस डिसीजमध्ये प्रकाशित झाला आहे.

अशाप्रकारे झाला प्रयोग
ग्लोसगोमध्ये सेंटर फॉर व्हायरस रिसर्चच्या टीमने हे संशोधन केले. प्रयोगादरम्यान पेशींसह एक संरचना तयार करण्यात आली, जी मनुष्याच्या श्वसन प्रक्रिया प्रमाणे काम करते. यामध्ये सर्दी-तापासाठी जबाबदार रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरस, दोघांना एकाच वेळी रिलिज केले गेले. परंतु प्रयोगादरम्यान दिसले की, संरचनेवर रायनो व्हायरसचा ताबा झाला, तर कोरोना व्हायरसपासून तो जवळपास अप्रभावित राहिला.