छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचा संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकदा छातीत जळजळ होत असल्यास आपण गांभीर्याने लक्ष देत नाही. खाण्यापिण्यात काहीतरी आले असेल असे समजून दुर्लक्ष करतो. मात्र, अशा प्रकारे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शरीराने दिलेले काही संकेत हे गंभीर आजारचे असतात. ही लक्षणे ओळखून ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. छातीत जळजळ असल्यास हा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिज (जीईआरडी) असू शकतो. यामध्ये पोटाचे एक अ‍ॅसिड पुन्हा फुड पाइपमध्ये जमा होते. या अ‍ॅसिडमुळे अन्ननलिकेला दुखापत होऊ शकते. तसेच अपचनाची समस्या होऊ शकते. दीर्घकाळ हा त्रास तसाच राहिल्यासराहिली तर अल्सर किंवा कँसर सारखे आजार होऊ शकतात.

जीईआरडी या आजाराचे काही संकेत असून ते दिसून आल्यास दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. दीर्घकाळ छातीत जळजळ होणे, तोंडात आंबट चव येणे, दीर्घकाळ छातीत दुखणे, जेवण गिळताना त्रास होणे, ड्राय कफची समस्या होणे, दिर्घ काळ घश्यात खवखव होणे, घश्यात गाठ तयार राहणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजारापासून बचाव करण्यासाठी धुम्रपान सवय ताबडतोब सोडून द्यावी. तसेच मद्यपानही करू नये. या सवयींमुळे लठ्ठपणा वाढतो. तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/