Coronavirus : आता छातीच्या X-Ray नं देखील होईल ‘कोरोना’च्या रूग्णाची ओळख, KGMU ला मिळालं यश

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात सर्वत्र पसरलेल्या कोरोना विषाणूचा साथीचा सामना करण्यासाठी सर्व लोक एकजूट झाले आहेत. सर्वजण त्यांच्या क्षमतेनुसार कोरोनाविरूद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. याच संदर्भात लखनऊच्या केजीएमयू आणि अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीने संयुक्तपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक कार्यक्रम तयार केला आहे. ज्याद्वारे केवळ छातीचा एक्स-रे पाहिल्यास समजेल की, रुग्ण कोरोना संक्रमित आहे की नाही.

x-ray

उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे रुग्णालय केजीएमयूने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोविड रुग्णांच्या छातीचा एक्स-रे मागवून हे काम सुरू केले आहे, जे लवकरच क्लिनिकल ट्रायल्समध्ये जाईल. लखनऊच्या केजीएमयूने पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यात म्हटले गेले की, चीन आणि अमेरिका नंतर केजीएमयू लवकरच एक्स-रे पाहून कोविड रूग्णांची ओळख पटवेल. एक्स-रे केवळ कोविडच्या रूग्णांनाबाबतच सांगणार नाही, तर फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्ण कधी आणि किती लवकर बरे होईल हे देखील समजू शकेल.

digonostic-system

दरम्यान, जेव्हा चीनमध्ये जलद चाचण्या कमी होत होत्या तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेची ही पद्धत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. या मॉडेलमध्ये अमेरिका, यूके, चीन आणि इतर काही देशही कोविड – 19 रूग्णांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. आता याची सुरूवात भारतातील केजीएमयूमध्ये होणार आहे.