लेखक चेतन भगतचा विधु विनोद चोपडांवर आरोप, म्हणाले – ‘मला आत्महत्येजवळ पोहोचवलं होतं’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  लेखक चेतन भगत यानं अलीकडेच सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराबद्दल क्रिटीक्सला घेऊन एक ट्विट केलं. यानंतर फिल्म क्रिटीक अनुपमा चोपडा आणि चेतन यांच्या ट्विटर वॉर सुरू झालं. यावेळी चेतननं अनुपमा यांचे पती विधु विनोद चोपडांवर सुसाईडसाठी फोर्स केल्याचा आरोप केला. चेतननं अस म्हटलं होतं की, सुशांतच्या दिल बेचारा सिनेमाचा रिव्ह्यु लिहताना फिल्म क्रिटीक्सला थोडं सेंसिबल व्हावं लागेल. जास्त ओव्हरस्मार्ट होऊन लिहिणं थोडं टाळावं लागेल. अनुपमा यांनी चेतनच्या या ट्विटला उत्तर देताना लिहिलं की, जेव्हा तुम्ही विचार करता की, माणसाच्या विचारांची पातळी यापेक्षा जास्त घसरणार नाही. परंतु दुर्दैवानं ती घसरतेच.”

यानंतर चेतन भगत यानं अनुपमा यांचे पती विधु विनोद चोपडा यांना मध्ये घेतलं. चेतन म्हणाला की, “मॅम, जेव्हा तुमच्या पतीनं मला सर्वांच्या समोर धमकावलं होतं. लाज न बाळगता माझं सर्व क्रेडिट घेतलं होतं. मी विचारल्यानंतरही 3 इडियट्स सिनेमात मला क्रेडीट देण्यास नकार दिला होता. मला आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं होतं. त्यावेळी तुम्ही फक्त तमाशा पहात होतात. त्यावेळी तुमच्या विचारांचा स्तर कुठे होता ?”

काही लोक चेतन सोबत सहमत तर काही असहमत
या ट्विटनंतर काही लोक सोशल मीडियावर चेतनची बाजू घेत आहेत तर काही त्याच्या विरोधात आहेत. काही लोकांनी असंही म्हटलं आहे की, रिव्ह्यु लिहताना काही क्रिटीक्स भेदभाव करतात. काहींनी या गोष्टीलाही विरोध केला आहे.