‘जगात कोठेही हिंदूंना धर्मासाठी दडपशाही सहन करावी लागली तर…’ : चेतन भगत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेत 8 तास वादळी चर्चा झाल्यानंतर सोमवारी (दि 9 डिसेंबर) नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर लेखक चेतन भगत यानं केलेलं ट्विट सध्या चर्चेत आल्याचं दिसत आहे. सोमवारी मध्यरात्री हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूनं 311 तर विरोधात 80 मतं पडली.

चेतन भगतनं आज (मंगळवार दि 10 डिसेंबर) ट्विट केलं आहे ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. आपल्या ट्विटमध्ये चेतन म्हणतो, “जगात कोठेही हिंदूंना आपल्या धर्मासाठी दडपशाही सहन करावी लागली तर त्यांनी भारताला आपलं घर मानावं. भारत या महान धर्माचं घर आहे आणि ते नेहमीच त्याचे संरक्षण करेल.” चेतननं ट्विट केल्यानंतर लगेचच या ट्विटची चर्चा सुरू झाली. अनेकांनी या ट्विटचं समर्थन केलं आहे तर काहींनी मात्र त्याच्या विरोधातही भाष्य केलं आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील अल्पसंख्य समाजासंबंधित असणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर सोमवारी रात्री उशीरापर्यंत लोकसभेत वादळी चर्चा झाली. या विधेयकामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीनच शेजारील देशांतील अल्पसंख्यांक व्यक्तींना नागरिकत्व दिले जाणार आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लिम आणि पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार आहे.Visit : Policenama.com
उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे