Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये कलाकारानं साकारलं 3888 ‘push pins’ नं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ‘पोट्रेट’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यभरात सध्या संचार बंदी सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कलाकारदेखील घरीच बसून आहेत. मात्र कलाकार मिळालेल्या वेळेत ही काही न काही कलाकारी करीतच असतात. अशाच प्रकारे पवई येथील रहिवासी असलेला आणि जेजे स्कुल ऑफ आर्टचा विध्यार्थी असलेल्या चेतन राऊतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक अनोखे पोट्रेट साकारले आहे.

पुशपिनच्या सहाय्याने त्याने हे पोट्रेट बनविले आहे. यात 3हजार 888 इतक्या पुश पिन वापरण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या लढ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करीत असलेल्या कामाचे कौतुक आणि त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी हे पोट्रेट चेतनने बनविले असल्याचे त्याने सांगितले. पेपर किंवा एखादी वस्तू अडकवण्यासाठी वापरण्यात येणारे हे पुशपिन असेही वापरले जातील याचा तुम्ही विचारही करू शकणार नाहीत.या संबंधी चेतनने एक फेसबुक पोस्टही केली आहे. त्याने याआधीही असे अनेक पोट्रेट बनवले आहे, ज्याची जागतिक पातळीवर नोंद करण्यात आली आहे. चेतनने चार हजारहून अधिक कॅसेट्सचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिचित्र साकारले होते. कॅसेट हा प्रकार आता दुर्मिळ झाला आहे. पण याचा वेगळा उपयोग चेतनने करण्याचे ठरवले आहे. चार हजारहून अधिक कॅसेटचा वापर करून चेतनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तीचित्र साकारले होते.

मुंबईतल्या चोरबाजार, मुंब्रा, लॅमिंग्टन रोड या ठिकाणच्या जुन्या सीडी विक्रेत्यांशी संपर्क साधून चेतनने हजारो सीडीज मिळवल्या. पिक्सेल आणि थ्रीडी पेंटिंग यांचे फ्युजन असणारे शिवरायांचे मोझॅक आर्ट या सीडीजच्या माध्यमातून त्याने साकारले आहे. तब्बल चार-पाच महिन्यांच्या प्रयत्नांतून चेतनने 75 हजारपेक्षा जास्त सीडीज गोळा केल्या होत्या. 110 फुट 90 फुट या भव्य आकाराचे हे जगातले सर्वात मोठे पोट्रेट ठरले आहे.