Chetan Sharma | चेतन शर्मा यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड

पोलीसनामा ऑनलाईन : मागच्या वर्षी पार पडलेल्या T-20 वर्ल्डकप नंतर BCCI ने चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली असणारी निवड समिती बरखास्त केली होती. त्यामुळे मागील जवळपास दीड महिन्यांपासून भारतीय क्रिकेट पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर आज BCCI ने नवीन निवडसमिती जाहीर केली. विशेष म्हणजे बरखास्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष असलेले चेतन शर्मा (Chetan Sharma) हेच पुन्हा एकदा स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीचे अध्यक्ष असणार आहेत. बीसीसीआयने ट्विट करून हि निवडसमिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये चेतन शर्मा यांच्याबरोबर चार नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

कोणाकोणाची निवड समितीमध्ये झाली निवड ?
चेतन शर्मासह शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांना निवड समितीमध्ये स्थान मिळाले आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या सदस्यांची निवड केली. बीसीसीआयला निवडकर्ता पदासाठी 600 हून अधिक लोकांकडून अर्ज आले होते. (Chetan Sharma)

सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध T -20 मालिका खेळत आहे, त्यानंतर एकदिवसीय मालिकाही होणार आहे.
नव्या निवड समितीसमोर आता न्यूझीलंड मालिकेसाठी संघ निवडीचे आव्हान या समितीसमोर असणार आहे.
तसेच T-20 फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार बनवायचा की नाही हा सर्वात मोठा निर्णयदेखील या समितीला
घ्यावा लागणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी देखील भारतीय संघाची
निवड करण्याची मोठी जबाबदारी या नवीन निवड समितीवर असणार आहे.

Web Title :- Chetan Sharma | bcci new selection committee announced chetan sharma re elected as president

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Govt Bank FD Interest Rate | या सरकारी बँका देत आहेत, ७% पेक्षा जास्त व्याज, आता FD केल्यावर मिळतोय मोठा रिटर्न

Ratan Raajputh | ‘या’ कारणामुळे टीव्ही-युट्युबवरुन गायब होती अभिनेत्री रतन रजपूत; केला मोठा खुलासा