Chhagan Bhujbal After Nawab Malik Arrest | मलिकांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal After Nawab Malik Arrest | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक (ED Arrest Nawab Malik) केली. नवाब मलिक यांना अटक झालेली असली तरी त्यांचा न्यायदेवतेपुढे गुन्हा (Crime) सिद्ध (Proved) झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा (Resignation) घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Chhagan Bhujbal After Nawab Malik Arrest)

 

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नवाब मलिक यांना झालेली अटक दुर्दैवी आहे. हे प्रकरण पीएमएले कायदा (PMLA Act) अस्तित्वात नव्हता तेव्हाचे आहे. महाविकास आघाडी सरकारचे (Maha Vikas Aghadi Government) मंत्री केंद्र सरकार (Central Government) आणि भाजपच्या (BJP) विरोधात बोलतात म्हणून हे 30 वर्षापूर्वीचे प्रकरण आता बाहेर काढण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

नवाब मलिक यांच्याकडून सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत.
भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळे त्यांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
उद्या सकाळी 10 वाजता मंत्रालय जवळील महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्याशेजारी आघाडीचे
सर्व मंत्री, आमदार (MLA) धरणे आंदोलन (Agitation) करणार असल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले.
तसेच परवापासून तिन्ही पक्ष शांततेच्या मार्गाने तालुका आणि जिल्हा पातळीवर मोर्चे, धरणे आंदोलन करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Chhagan Bhujbal After Nawab Malik Arrest | NCP leader and minister chhagan bhujbal has said that crime of nawab malik has not been proved so there is no question of his resignation

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडे बोल्ड ड्रेसच्या नादात झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाला कॅमेरामध्ये कैद…

 

Vaani Kapoor Hot Video | वाणी कपूरनं चक्क कॅमेरा समोरचं काढलं श्रग; चाहते म्हणाले – ‘गर्मी वाढली’ ! पाहा व्हायरल व्हिडिओ

 

Wipro PARI Signs An MoU With COEP | अद्ययावत उत्पादन आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र स्थापनकरण्यासाठी विप्रो पारीचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोबत सामंजस्य करार