नाशिककरांसाठी मोठी बातमी ! Lockdown ‘शिथिल’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन Lockdown आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यात परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत नाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन Lockdown शिथिल करण्यात आलं आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर ९६.१६ टक्के इतका आहे. नाशिक जिल्ह्यात ३० मे रोजी ६७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर, बरे झालेल्या रुग्णांचा आकडा एक हजारच्या पुढं होता. लॉकडाऊन शिथिल करताना जिल्हा प्रशासनानं सलून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज ही घोषणा केली. ‘सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केलेलं काम आणि नाशिककरांनी त्यांना केलेल्या सहकार्यामुळं जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे,’ असं भुजबळ यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे देखील यावेळी उपस्थित होते.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार

दरम्यान, जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत व्यावसायिक आस्थापना खुल्या राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत. सरकारी कार्यालये २५ टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहेत. हॉटेलमधून होम डिलिव्हरी देता येणार आहे. वाईन शॉप, मिठाईच्या दुकानदारांनाही पार्सल सेवा देता येणार आहे. दूध, भाजी, पेट्रोल व डिझेलची विक्री आधीप्रमाणेच सुरू राहणार आहे. मॉल मात्र बंद राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यात काही अटी व शर्थींसह सलून व्यावसायिकांना दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळी सात ते दोन याच कालावधीत सलून सुरू ठेवता येणार आहे. तिथं दुकानदारांनी फेस शील्ड वापरणं अत्यावश्यक असेल. त्याशिवाय, दोन खुर्च्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवणं बंधनकारक असेल. सलून दुकानदारांना केवळ दाढी व कटिंग करता येणार आहे. फेस मसाजला बंदी असेल.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी