नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या पंचाहत्तरीनिमित्त नांदेडमध्ये विशेष कार्य़क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्य़क्रमात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सध्याचं राजकारण (Politics), शिवसेनेचा वाद, शिवसेना (Shiv Sena) सोडण्याचं कारण तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत स्पष्टपणे उत्तरं दिली.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर (Senior Journalist Praveen Bardapurkar) यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री (CM) म्हणून बघायला आवडेल की विरोधी पक्षनेता (Opposition Leader) म्हणून असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच विरोधी पक्षनेते म्हणून बघायला आवडेल. ते विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम करतात, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे धैर्याने उभे आहेत
पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) धैर्याने उभे राहिले. त्यांचे कौतुक केले पाहिजे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. सर्वस्व गमावल्या नंतर एखादा व्यक्ती अंथरुणाला खिळला असता पण उद्धव ठाकरे हजारोंच्या गर्दी समोर बोलतात ही सोपी गोष्ट नसल्याचे भुजबळ म्हणाले.
यामुळे शिवसेना सोडली
शिवसेना सोडण्याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, मंडल आयोगाच्या (Mandal Commission)
विरोधात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भूमिका असल्यामुळे शिवसेना सोडावी लागली.
भुजबळ यांच्या नाशिक येथील फार्म हाऊसवर असताना बाळासाहेब ठाकरे यांनी पोटाला जात नसते असे म्हणत मंडल आयोगाला विरोध केला होता.
त्याच दिवशी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात मंडल आयोग नेमण्याच्या मागणीसाठी व्हीजेएनटी चा मोर्चा निघाला होता.
या दोन्ही बातम्या वर्तमानपत्रात अल्यानंतर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे भुजबळ यांनी सांगितले.
Web Title :- Chhagan Bhujbal | chagan bhujbal wants devendra fadnavis to be in opposition every time
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Salman Khan | पुन्हा एकदा सलमान खानला ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी; “अगली बार बडा झटका देंगे, ….”
Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…