Chhagan Bhujbal | ओबीसी आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीत तुम्ही एकटे पडलाय का? छगन भुजबळ थेट म्हणाले, ”अजित पवार त्या…”

नाशिक : राज्य सरकारमधील (State Govt) कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) उघडपण भूमिका घेत वादग्रस्त विधानांचा सपाटा लावला असल्याने एकुणच राज्य सरकारमधील सर्वच घटक पक्षांची कोंडी झाली आहे. भुजबळांमुळे सरकारसुद्धा मराठा आरक्षणाविरोधात आहे असा संदेश जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणताही नेता भुजबळांचे समर्थन करताना दिसत नाही. उलट, मध्यंतरी अजित पवारांनी देखील भुजबळांचे (Chhagan Bhujbal) नाव न घेता सर्वच पक्षातील वाचाळवीरांना सल्ला दिला होता. यावरूनच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आता भुजबळ यांनी थेट उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गेले असताना सध्याच्या आरक्षण वादावर म्हणाले होते की, सगळ्याच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कशा प्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

दरम्यान, अजित पवार वाचाळवीर कोणाला म्हणाले? त्यांनी हा सल्ला कोणाला दिला? अशी चर्चा सुरू झाली होती.
तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) सातत्याने अजित पवारांकडे
मागणी करत आहेत की, त्यांनी छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) रोखावे. आज यावरूनच पत्रकारांनी भुजबळांना
प्रश्न विचारला की, तुम्ही ओबीसी आंदोलनादरम्यान (OBC Movement) पक्षात एकटे पडला आहात का?
यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार त्या दिवशी म्हणाले, प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे.
मी जबाबदारीनेच बोलत आहे. भाषणांवेळी कागदी पुरावे दाखवत आहे. हे कागद, हे पुरावे म्हणजे जबाबदारी नाही का?
मुळात माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे.
तसेच माझा झुंडशाहीला विरोध आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर, छगन भुजबळांसारख्या…

Pune Pimpri Crime News | मनाविरुद्ध मुलाला जन्म दिल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला अटक; भोसरी परिसरातील घटना