Chhagan Bhujbal | छगन भुजबळांचे धक्कातंत्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत, सरकारवर उपरोधिक टीका!

मुंबई : Chhagan Bhujbal | मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी २४ डिसेंबरपासून आंदोलन करून नये, यासाठी काल मंत्र्यांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटीत गेले होते, तिथे सरकारच्या वतीने जरांगेंची समजुत काढण्याचा प्रयत्न झाला. सरकारने जरांगेंना महत्व दिल्याची नेमकी हीच बाब अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री छगन भुजबळ यांना खटकली आहे. यावरून भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सरकारवर उपरोधिक शैलीत टीका केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत.
एखाद्या महिलेची कुणबी नोंद आढळल्यानंतर तिच्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) द्या. मंत्र्यांचे दोन-तीन बंगलेही जरांगेंच्या उपोषणस्थळी बांधा. मुख्य सचिवांचाही बंगला तिकडेच बांधा. म्हणजे जरांगेंनी एखादी मागणी केली की लगेच जीआर सरकारला काढता येईल. जाण्या-येण्याचा वेळही वाचेल.

भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मनोज जरांगे हे अजिबात सरकारला वेठीस धरत नाही.
उलट सरकारच वेळकाढूपणा करत आहे. जरांगेंच्या मागण्या ताबोडतोब मान्य करायला हव्यात.
तसेच मी आतापर्यंत केलेली सर्व भाषणे मागे घेतो, सर्व वक्तव्य मागे घेतो, असे म्हणत भुजबळ यांनी आपला
संताप व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies For Snoring | ‘या’ 5 घरगुती उपायांनी होईल घोरण्याची समस्या कायमची दूर, घोरण्यापासून मिळेल लवकरच आराम…

Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.

किरकोळ कारणावरुन कॉलेज तरुणांमध्ये राडा, तरुणाच्या डोक्यात वार; आण्णासाहेब मगर कॉलेज जवळील घटना