Chhagan Bhujbal | पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे छगन भुजबळांची मोठी मागणी; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मोठी मागणी केल्याचे वृत्त हाती आले आहे. यात त्यांनी बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी(Chhagan Bhujbal) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनीही ओबीसी जनगणना केल्या. त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झाला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र, इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी.’ अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत पुढे या पत्रात त्यांनी(Chhagan Bhujbal) लिहिले आहे की, ‘देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना गेली १५० वर्षे होत आलेली आहे. त्या माहितीच्या आधारे या वर्गाच्या विकास योजना, कल्याणकारी कार्यक्रम आणि आर्थिक तरतुद केली जाते. नागरिकांचा मागासवर्ग म्हणजेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्यासाठी मंडल आयोगाने १९८० मध्ये केलेल्या शिफारशींनुसार देशात हा तिसरा मागासवर्ग अस्तित्वात आला. मात्र, त्याला घटनात्मक संरक्षण पुरवताना दरवेळी जनगणना नसल्याने लोकसंख्या माहित नसल्याचे कारण पुढे येते.’ असेही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे, ‘ब्रिटिशांनी भारत जिंकला तेव्हा पहिले काम केले ते म्हणजे दर १० वर्षांनी त्यांनी जातीनिहाय जनगणना सुरू केली. ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांचा अभ्यास करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे,
असे त्यांना वाटले. १८७१ ते १९३१ अशी ६० वर्षे हे काम नियमितपणे होत असे.
१९४१ च्या महायुद्धात हे काम विस्कळीत झाले.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय,
तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले.
यातून मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले आहेत.’ असेही ते म्हणाले. (Chhagan Bhujbal)

तसेच याबाबत पुढे बोलताना छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, ‘१९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या ओबीसी विषयक पुस्तकात ओबीसी जनगणनेची मागणी केली.
ओबीसींच्या अडीअडचणी कळण्यासाठी ती गरजेची आहे असे त्यांनी लिहिले.
पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने (कालेलकर कमिशन) १९५५ मध्ये स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली.
१९८० मध्ये दुसऱ्या राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने (मंडल आयोग) स्वतंत्र ओबीसी जनगणनेची पुन्हा शिफारस केली.’
असेही संदर्भ यावेळी छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbal demand independent census of obc community in maharashtra like bihar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर अजित पवारांची तीव्र नाराजी; म्हणाले…

Pune Pimpri Crime | OLX वर कार घेणं पडलं महागात, युवकाची साडेचार लाखाची फसवणूक; सांगवी परिसरातील घटना