Chhagan Bhujbal | ‘देवेंद्र फडणवीसांमधील ‘हा’ एक गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही’ – छगन भुजबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान केलं होतं. यावरुन सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्या दरम्यान देवेंद्र फडणवीस याच्यांवर निशाणा साधला. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुणांची तुलना करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

छगन भुजबळ म्हणाले की, ‘दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसारखी फटकेबाजी केली. त्यात तथ्य आहे. कोणाच्या घरात 5-7 धाडी सुरू आहेत हे कोणालाच आवडत नाही. पण त्यांचं ते कामच आहे. त्यावर मुख्यमंत्री बोलले. पण विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांना उत्तर देणं फडणवीसांना आवश्यकच आहे. त्यामुळं त्यांनी ते दिलं, असं सांगतानाच एक गुण जो फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) होता तो उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

कारण फडणवीस सरकारच्या काळात कोणत्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला की ते ताबोडतोब क्लिन चिट द्यायचे. त्याच्यामुळं 20-20 वेळा मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाल्यानंतर लगेच क्लिनचिट. पोलिसांचे जे प्रमुख होते ते आगोदरच क्लिन चिट द्यायचे. मग खालच्या लोकांना पण द्यावेच लागणार. फडणवीसांचा हाच गुण उद्धव ठाकरेंमध्ये (CM Uddhav Thackeray) नाही. असं ते म्हणाले. पुढे बोलताना भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे की, फडणवीस क्लिन चिट मास्टर आहेत, असा टोला लगावत, ते म्हणाले, हा अवगुण आहे असं मी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलू शकत नाही, असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on cm uddhav thackeray shivsena dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime | धक्कादायक ! कुटुंबाला ठार करण्याची धमकी देत भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घाणेरडं कृत्य

Nawab Malik | फ्लेचर पटेल आणि एनसीबीचा काय संबंध? 3 केसेसमध्ये एकच पंच कसा? – नवाब मलिक

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा होती हे मान्य करा’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)