Chhagan Bhujbal | ‘तीन पक्षाचं सरकार असल्यानं थोडं घर्षण होणारच’ – छगन भुजबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सातत्याने कुरघोड्या सुरू असल्याचा आरोप केला आहे. भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत (Bhandara Gondia Zilla Parishad Election) काँग्रेसला बाजूला करुन राष्ट्रवादीने भाजपसोबत (BJP) आघाडी केल्यानेच नाना पटोले संतापले आहेत. ‘मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसलाय’, असं विधान नाना पटोले यांनी केले. यानंतर यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली.

 

”तीन पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे थोडं तरी घर्षण होणार आहे. एक पक्षाच सरकार असलं तरी होतं. इथ आम्ही तीनजण आहोत.” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेसंदर्भात भाष्य केलं आहे. हा राज्य सरकारला धक्का मानत नाही. मध्य प्रदेशलाही हाच निर्णय देण्यात आला आहे. जर इम्पिरिकल डेटा मिळाला असता तर हे संकट आलं नसतं. यामागे भाजपचा काय उद्देश आहे हे माहित नाही,’ असं देखील ते म्हणाले.

 

काय म्हणाले होते नाना पटोले ?
नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातत्याने कुरघोड्या सुरू असल्याचा आरोप केला आहे.
“मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे.
आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू”, असं ट्वीट नाना पटोले यांनी केलं आहे.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on congress leader nana patole statement of ncp bjp zp election bhandara

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा