Chhagan Bhujbal | रोहित पवार मंत्रिमंडळात जाण्यासाठी होते तयार; मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर पक्षामध्ये अजित पवार गट (Ajit Pawar Group) व शरद पवार गट (Sharad Pawar Group) निर्माण झाले आहेत. या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद समोर आला असून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शरद पवार गटातील आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे सध्या ॲक्शनमोडमध्ये आले असून ते अजित पवार गटातील नेत्यांवर जहरी टीका करताना दिसून येत आहे. रोहित पवार विरुद्ध अजित पवार गटातील नेते अशी परिस्थिती दिसून येत आहे. आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं असा निर्णय घेत पत्रावर सह्या केल्या असल्याचा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.

राष्ट्रवादीतील आणखी एक आमदार व खासदार अजित पवारांना सामील होणार अशी चर्चा सर्वत्र असताना रोहित पवार
यांनी अजित पवार गटाकडून नेत्यांचे ब्लॅकमेल करत असून तू सही कर नाहीतर काम होणार नाही,
असं कदाचित सांगितलं जात असेल असा आरोप रोहित पवार यांनी केला. यावरुन छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, ‘अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सगळ्यांच्या सह्या पत्रावर करण्यात आल्या होत्या. विरोधी पक्षात असल्यावर हे बोलायला पाहिजे, नाहीतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल? यासाठी हा खटाटोप चालू असल्याचा टोला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, “पवार साहेब म्हणाले होते, कायदेशीर लढाई लढणार नाही. पण नोटीसा द्यायचे काम झाले आहे.
बघू काय होते ते?” असे मत भुजबळांनी व्यक्त केले आहे. तसेच मंत्री भुजबळ विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार
(Vijay Wadettiwar) यांच्या टीकेला देखील उत्तर देत म्हणाले की,
“विरोधी पक्षाकडून टीका सुरु आहे, ते त्यांचं काम करत आहेत.
ते सगळे बोलणारच, विरोधी पक्षात असल्यावर ते काय करू शकतात?” असा खोचक टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | ‘ते वक्तव्य अजित पवारांना उद्देशून नव्हतं’ सुप्रिया सुळेंनी केला खुलासा (व्हिडिओ)