Chhagan Bhujbal | सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळेलही, पण त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले – छगन भुजबळ…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी उमेदवारी मागण्यात आली असती तर ती दिली असती, पण पक्षाचा अधिकृत फॉर्म देऊन देखील उमेदवारी अर्ज न दाखल केल्यामुळे आता बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) अडचणीत आले आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना मिळेल असे वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात, पण आपलं कुटुंब जर मजबूत असेल तर घर फुटत नाही. असे देखील यावेळी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील निवडणुकींमुळे राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यावेळी बोलले. नाशिक येथे आज (दि.२१) त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदविली. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सुधीर तांबे (Sudhir Tambe) हे दोन ते तीन वेळा आमदार झाले असून त्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगल्या भावना आहेत. तांबे माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी त्यांना पाठिंबा देतो असे सांगितले. गेल्या तीन वेळा आमदार असल्याने त्यांच्याबद्दल नागरिकांच्या देखील चांगल्या भावना आहेत. पण त्यांनी अचानक अस का केले, हे मला देखील कळाले नाही. शिवाय भाजपाचा पाठिंबा तांबे यांना मिळेल असं वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही. असे यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले.
पंकजा मुंडे यांच्या प्रकरणावर त्यांना (Chhagan Bhujbal) प्रश्न विचारला गेला असता,
त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राजकारणात वेगवेगळ्या कारणांमुळे नाराजी येऊ शकते.
कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे नेते नाराज असतात. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या १६४ च्या १८४ जागा
होतील असे अलिकडेच वक्तव्य केले होते. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, ते निवडणुकीत समजेल की १८४
होणार की कमी होणार ते.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षण (OBC Reservation), संजय राऊत (Sanjay Raut) यांचा
भारत जोडो यात्रेतील (Bharat Jodo Yatra) सहभाग आणि ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेले वाक् युध्द
यावर देखील भाष्य केले.
Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbal s reaction on satyajit tambe s nashik election
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update